वॉशिग्टन दि.१६ – विजेची जगभरात भासत असलेली कमतरता दूर करण्यासाठी अपारंपारिक उर्जास्त्रोतांचा वापर करण्याकडे कल वाढत आहे. त्यातील एक महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे सौर उर्जा. मात्र यासाठी बसवावी लागणारी पॅनल सध्यातरी बरीच खर्चिक असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाहीत. मात्र यावर बफेलो विद्यापीठातील संशोधक क्विओक्विग गॅन यांनी उपाय शोधून काढला आहे.
गॅन यांनी अधिक उर्जा देऊ शकणार्याश आणि तरीही किंमतीत सौर बॅटर्यांच्या तुलनेत कमी खर्चिक अशा नवीन जनरेशनच्या फोटो व्होल्कॅनिक बॅटर्या विकसित केल्या आहेत. मात्र या लिक्विड फॉर्ममध्ये असल्याने कोणत्याही पृष्ठभागावर रंगाप्रमाणे लावता येतात. सध्या सौर उर्जेसाठी पॉलीक्रिस्टल सिलीकॉन वेफर्स वापरले जातात अथवा कमी जाडीचे सोलर सेल वापरले जातात मात्र हे दोन्ही पर्याय महागडे आहेत व सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत.
गन यांनी अगदी पातळ फिल्म सोलर सेलचा वापर केला असून त्यावर ऑरगॅनिक मटेरियल पासून बनविलेले पॉलिमरसारखे रसायन उपयोगात आणले आहे. हे मटेरियल कार्बन बेस्ड आहे आणि छोट्या कणांपासून बनविलेले असल्याने त्याचा खर्चही कमी आहे.हे लवचिक रसायन कोणत्याही पृष्ठभागावर पसरविता येते. भिंतीला रंग दिल्याप्रमाणे हे रसायन पृष्ठभागावर पसरविले जाते आणि त्यापासून सौर ऊर्जा निर्मिती होऊ शकते.
हे संशेाधन अॅडव्हान्स मटेरियल जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.