दुष्काळाचा फटका भाजीपाल्याना

पुणे- दुष्काळाचा फटका नागरीकाबरोबरच प्राणीमात्रांना बसला आहे. ग्रामीण भागात पाणीटचाई मोठ्याप्रमाणात जाणवत आहे. आता या दुष्काळाचा फटका भाजीपाल्याना बसला असून पाण्याअभावी भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्याचा फटका गृहिणींणा बसला असून बजेट कोलमडले आहे तर भाजी उत्पादक शेतकरी मात्र दरवाढीने सुखावला आहे. आगामी काळात अजून काही दिवस तरी दर कमी होण्याची शक्यता नाही. भाज्यांचेही दर वाढल्यामुळे रोजच्या जेवणातून अनेक भाज्या गायब झाल्या आहेत.

दुष्काळी स्थितीमुळे आणि पाणीटंचाईमुळे राज्यातील शेती उद्ध्वस्त झाली आहे. याचा सर्वाधिक फटका पालेभाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे. पालेभाज्यांचे उत्पादन घटल्यामुळे या पालेभाज्यांची भाजीमंडईतील आवक घटली आहे. मेथी , कोथिंबीर , पालक , शेपू अशा भाज्या तर दुर्मिळ झाल्या आहेत. तर हिरवी मिरची , ढोबळी मिरची , कोबी , प्लॉवर कोबी , भेंडी , टोमॅटो , बटाटे अशा भाज्यांचेही दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे रोजच्या जेवणातून अनेक भाज्या गायब व दुर्मिळ झाल्याचे चित्र आहे. सध्या बाजारपेठेत केवळ गवार आणि वांगी , शेवग्याची शेंग यांचे दर काही प्रमाणात आवाक्यात असल्यामुळे जेवणा या भाज्यांचा वापर वाढला आहे.

गेल्या काही दिवसपासून पाण्याची टंचाई असल्याने भाजीपाल्यांचे उत्पादनात घट झाली आहे.त्याशिवाय विक्रीसाठी येणा-या या भाजीपाल्याचा वाहतुकीचा खर्चही मोठा असल्यामुळे त्यांनाही हा भाजीपाला वाढीव दराने विकल्याशिवाय पर्याय नाही. एकंदरीत भाजीमंडईत सध्या भाजी खरेदी करणा-यांची मोठी अडचण होऊ लागली आहे. जुलैअखेरपर्यंत भाजीपाल्यांची हीच अवस्था असेल असे चित्र आहे.

Leave a Comment