सलग आठव्या दिवशीही व्यापार बंद – आंदोलन सुरुच ठेवण्यावर व्यापारी ठाम

पुणे, दि. 15 (प्रतिनिधी)-स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात सुरु असलेल्या बेमुदत बंद आंदोलनाच्या आजच्या सलग आठव्या दिवशीही शहर व उपनगरातील व्यापार्‍यांनी बंदला प्रतिसाद देत व्यापार बंद ठेवले. एलबीटीविषयी तोडगा निघेपर्यंत बंद आंदोलन सुरु ठेवण्याच्या निर्णयावर व्यापारी ठाम आहेत, अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.

राज्य सरकार वेळकाढूपणा करीत असल्याने हे आंदोलन ताणले जात आहे. परिणामी राज्य सरकारच्या विरोधात व्यापार्‍यांच्या तीव‘ भावना होत असल्याने आंदोलन तीव‘ होऊ पाहात आहे. त्यामुळे वेळीच सरकारने याची दखल घ्यावी, असे खजिनदार फत्तेचंद रांका यांनी सांगितले.
बंदला पाठिंबा
मिठाई, फरसाण व दुग्ध विक‘ेता संघाने व्यापार्‍यांच्या बेमुदत बंदला पाठिंबा दिला असून तेही या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे केदार चितळे यांनी महासंघाला कळविले आहे.

महाआरती व जनजागृती
गुलटेकडी मार्केटयार्डातील शारदा गजानन, सारसबागेसमोरील महालक्ष्मी व दत्तनगर येथील मंदिरामध्ये व्यापार्‍यांनी महाआरतीचे आयोजन केले होते. तसेच, फर्गसन रस्ता व जंगली महाराज रस्ता याठिकाणी जनजागृतीसाठी पत्रके वाटण्यात आल्याचे कृती समितीचे जयंत शेटे यांनी सांगितले.
मु‘य सचिवांबरोबर बैठक
राज्याचे मुख्य सचिव आणि पुणे व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांच्यात एलबीटीतील जाचक तरतुदींवर मुंबईत सविस्तर चर्चा झाली असून त्यावर शुक‘वारी चर्चा करुन निर्णय घेवू असे आश्‍वासन जयंतकुमार बांठिया यांनी व्यापार्‍यांना दिल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.

Leave a Comment