बीडमध्ये मुलीचे प्रमाण वाढले

म . टा . प्रतिनिधी , बीड
गेल्या काही दिवसापासून बीडमधील महिलांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले होते. वर्षभरापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या स्त्रीभ्रूण हत्यांच्या गोरखधंद्यांना वाचा फुटली होती. त्यानंतर प्रशासणाने मात्र त्यांच्यावर कारवाई केल्याने गेल्या वर्षभरात बीड जिल्ह्यातील स्त्री – जन्मदर तब्बल शंभरने वाढले आहे .

गेल्या वर्षभरात स्त्रीभ्रूण हत्येच्या मुद्द्यावरून बीड जिल्ह्याचे नाव चर्चेत येत राहिला. गेल्या वर्षी १८ मे रोजी बीडमधील डॉ . सुदाम मुंडेंच्या हॉस्पिटलमध्ये विजयमाला पट्टेकर या महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यामध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या स्त्रीभ्रूण हत्यांच्या गोरखधंद्यांना वाचा फुटली होती.

बदनामीनंतर प्रशासनाने लावलेल्या कारवाईच्या धडाक्याची फळे आता दिसत आहेत. प्रसारमाध्यमे आणि अशा प्रकरणांबाबत सतर्क असलेले नागरिक यांच्या वाढत्या रेट्यामुळे प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली होती. गेल्या वर्षभरात बीड जिल्ह्यातील स्त्री – जन्मदर तब्बल शंभरने वाढल्याचे सकारात्मक चित्र आहे .

बीड जिल्ह्यत गेल्यावर्षी एक हजार मुलांमागे केवळ ७९६ इतका असलेला मुलींचा जन्मदर या वर्षी ८९२ इतका झाला आहे. शिरूर , कासार तालुक्यांत दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण सर्वांत कमी म्हणजे ७७६ होते . मात्र , एक एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१३ या काळात शिरूर तालुक्यात मुलींची संख्या नऊशेच्या पुढे गेली आहे , अशी माहिती शिरूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी दिली .

Leave a Comment