मुंबई दि.१५ – केवळ दहा महिन्यापूर्वी लाँच झालेल्या महिद्र रेनॉल्ट इंडियाच्या डस्टर या युटिलिटी वाहनाने विक्रीचा तडाखा कायम राखला असून एप्रिलमध्ये त्यांच्या ५३६२ गाड्या विकल्या गेल्या आहेत.विशेष म्हणजे वाहन उद्योग मंदीचा अनुभव घेत असताना डस्टरने ही कामगिरी केली आहे. विक्रीत कंपनीच्याच स्कॉर्पिओला मागे टाकत डस्टरने आघाडी घेतली आहे. डस्टर सध्या देशातील दोन नंबरची सर्वाधिक विकली जाणारी यूव्ही ठरली आहे.
भारतीय वाहन उत्पादक संघटनेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार बोलेरो प्रथम क्रमांकावर असून त्यांची ९७६६ वाहने विकली गेली आहेत. त्यापाठोपाठ डस्टरचा क्रमांक आहे. त्यानंतर मारूती एर्टिगा – ५१६८, ओम्नी, स्कॉर्पिओ यांचा नंबर आहे.
महिंद्र रेनॉल्टचे कार्यकारी संचालक सुमित सहानी म्हणाले की आमच्या उत्पादनात डस्टरचे यश विशेष आहे कारण या गाडीचे ग्राहक समाधानी आहेत. मार्चमध्ये एप्रिलपेक्षाही अधिक गाड्या आम्ही विकल्या आहेत. आम्हाला यापुढे फोर्डच्या एको स्पोर्ट गाडीशी तीव्र स्पर्धा करावी लागणार आहे आणि या स्पर्धेतही आम्ही यशस्वी होऊ असा आम्हाला विश्वास आहे.