व्यापा-यांवर एस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा

मुंबई: एलबीटीविरोधात दुकाने बंद ठेवून नागरिकांना वेठीस धरणा-या व्यापा-यांवर एस्मा अंतर्गत कारवाई करुन त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा राज्य सराकारने दिला आहे. आगामी काळात संप मागे न घेतल्या व्यापा-यांवर एस्मा किंवा शॉप अॅक्टनुसार कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी सांगितले.

मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आणि व्यापा-यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. राज्य सरकारने एलबीटी रद्द करावा अशी मागणी व्यापा-यांनी केली. पण कोणत्याही परिस्थितीत एलबीटी रद्द करण्यात येणार नाही, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.

एलबीटीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक समिती नेमली होती. त्या समितीची बैठक पार पडली. व्यापा-यांनी आपल्या मागण्या लेखी स्वरुपात द्याव्यात असे यावेळी सांगण्यात आले.
एलबीटी हटवण्यासाठी सहा महापालिकांमध्ये व्यापा-यांनी बंद पुकारला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठीही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
छायािचित्राच्या ओळी: आज पुण्यातील व्यापार्‍यांनी एलबीटीच्या विरोधात प्रचंड मोंर्चा काढला होता.

Leave a Comment