नवी दिल्ली, दि.१४ – लडाखमधील घुसखोरी ही वेगळ्या स्वरूपाची घटना होती. त्यातून आम्ही अनेक धडे घेतले, अशी कबुली चीनने दिली आहे. याशिवाय, भारताबरोबरचा प्रलंबित सीमा मुद्दा सोडवण्यासाठी दुप्पट प्रयत्न करण्याची गरजही चीनने बोलून दाखवली आहे.

चिनी सैनिकांनी मागील महिन्यात भारतीय हद्दीतील लडाखमध्ये घुसखोरी केली होती. त्यावरून दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, लडाखमधील घुसखोरी ही वेगळ्या स्वरूपाची घटना होती. त्यातून आम्ही अनेक धडे घेतले, अशी कबुली चीनमधील सूत्रांनी एका वाहिनीशी बोलताना दिली. तणाव वाढत जाऊन द्विपक्षीय संबंधांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकला असता. मात्र, चीनने तसे घडू दिले नाही, अशी पुस्तीही या सूत्रांनी यावेळी जोडली.
दरम्यान, चीनचे नवे पंतप्रधान लि केकियांग पुढील आठवड्यात भारत दौर्यातवर येणार आहेत. या पार्श्वनभूमीवर, प्रलंबित सीमा मुद्द्यावरील तोडग्यासाठी भूमिका बदलल्याचे संकेत चीनने दिले आहेत. लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी दुपटीने प्रयत्न करण्याच्या गरजेवर त्या देशाने भर दिला आहे. सीमावाद हा गुंतागुंतीचा मुद्दा आहे. त्यामुळे या मुद्द्यावरील तोडग्यासाठी वेळ लागेल, अशी भूमिका चीनने प्रदीर्घ काळपासून घेतली होती. त्यामुळेच चीनने घेतलेल्या नव्या भूमिकेतून केकियांग यांच्या दौर्यावेळी सीमा मुद्दा केंद्रस्थानी येऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.