लकी नंबरसाठी मोजा तिप्पट रक्कम आजपसून अंमलबजावणी

पुणे, दि. 14 (प्रतिनिधी) – आपल्या गाडीचा नंबर म्हणले आयडेन्टीटी, आपला भाग्यांक, आपला आवडता नंबर, नंबरची थोडी वेगळी मांडणी केली तर एखादे नाव त्या नंबर मधुन प्रतिबिंबीत होते, असा लकी नंबर मिळविण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात, ते मोजण्याची तयारी अस्सली तरी उद्यापासून ( बुधवार) हा लकी नंबर चांगलाच महागात पडणार आहे कारण या नंबरसाठी आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ( आरटीओ) तिप्पट रक्कम मोजावी लागणार आहे.
पुणे शहरात दिवसागणिक वाहनांची सं‘या वाढत आहे. त्यामुळे वाहनासाठी लकी नंबरचा म ट्रेंड म ही पुणेकरांमध्ये वाढत आहे. अशा नंबरसाठी पुणेकर दरवर्षी करोडो रुपये मोजतात. सर्वाधिक मागणी असलेले लकी नंबर आरटीओ कडुन राखून ठेवले जातात. त्यासाठी मी स्वरूपात जादा आकारणी केली जाते. नव्या निर्णयानुसार टू्व्हीलर आणि चारचाकींच्या अशा नंबरसाठी किमान तीन हजार ते तीन लाख रुपयांपर्यंत मी निश्चित करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी टू व्हीलरच्या सिरिजमधील नंबर घेऊन एका कारमालकाने तब्बल तीन लाख रुपये मोजले होते. नंबर मिळण्यावरून अनेकदा लोकांमध्ये वादाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सिरिज सुरू होण्याआधीच अर्ज मागविण्यात येतात, त्या अर्जासोबत संबध्त लकी नंबरसाठी असलेल्या मीचा डीडी द्यावा लागतो. एका नम्बरसाठी जादा अर्ज आल्यास लकी ड्रॉच्या माध्यमातुन नंबर वाहनचालकाला देण्यात येतो.
या विषयी बोलताना प्रादेशिक परिवहन अधिकारी अरूण येवला म्हणाले, लकी नंबरला पुण्यात मागणी आहे. केवळ शहरातच नव्हे तर, ग‘ामीण भागातही लकी नंबरला वाहनधारकंची पसंती असल्याचे दिसून आले आहे. असा नंबर ही ओखळ समजली जाते. त्यामुळे या नंबरसाठी जादा पैसे मोजले जातात. आरटीओल मिळणारे सर्वाधिक उत्पन्न हे याच लकी नंबरच्या माध्यमातुन मिळते. लकी नंबरची मी तीनपट वाढविण्यात आली असली तरी या नंबरच्या मागणीवर परिणाम होण्याची श्‍नयता नसल्याचे त्यांनी सांगीतले.

लकी नंबर चारचाकी मी टू ्व्हीलर
1 तीन लाख रुपये 50 हजार रूपये
9, 99, 999 एक लाख 50 हजार रूपये 20 हजार रूपये
111, 222, 333 70 हजार रूपये 15 हजार रूपये

Leave a Comment