पोलार्डच्या फटकेबाजीमुळे मुंबई अव्वलस्थानी

मुंबई – वानखेडे स्टेडीयमवरील चुरशीच्या सामन्यात किरॉन पोलार्डच्या उत्तुंग आठ षटकारांनी मुंबई इंडियन्सनी हैदराबादवर सनसनाटी विजय मिळवला. या विजयामुळे आता गुणतक्त्यात मुंबई इंडियन्सने १४ पैकी १० सामने जिंकत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील सात सामन्यापैकी हा सहावा विजय आहे.

या सामन्यात हैदराबादने सुरुवातीला फलंदाजी करताना दोन गडी बाद १७८ अशी धावसंख्या उभारली होती. त्याला प्रत्युतर देताना एकेवेळी पिछाडीवर असलेल्या मुंबईने किरॉन पोलार्डच्या उत्तुंग आठ षटकारांच्या मदतीने त्यांनी केवळ २७ चेंडूत ६६ धावा केल्या. या पोलार्डने केलेल्या धुलाईच्या जोरावर मुंबईने हैदराबादवर ७ विकेट्स आणि तीन चेंडू राखून विजय नोंदवला.

या विजयाने मुंबईने पॉईंट टेबलमध्येही अव्वल स्थान गाठले आहे. मुंबईच्या खात्यात आता १४ सामन्यात १० विजय आणि ४ पराभवांसह २० गुणांची नोंद झाली आहे. मुंबईने सरस रनरेटच्या आधारावर पॉईंट टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सनाही मागे टाकले आहे. पण त्याचवेळेला प्ले ऑफच्या शर्यतीत हैदराबाद सनरायझर्स पुन्हा पिछाडीवर फेकली गेली आहे.हैदराबाद आणि बंगलोर आता एकाचं पंक्तीत आले आहेत. हैदराबाद आणि बंगलोरच्या खात्यात आता १४ सामन्यांत ८ विजय आणि ६ पराभवांसह समान १६ गुणांची नोंद आहे, पण नेट रनरेटमध्ये बंगलोर हैदराबादपेक्षा आघाडीवर आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या सामन्यात त्यांची कामगिरी कशी राहणार यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

Leave a Comment