झिरो शॅडो डे: शून्य सावली म्हणजे काय रे भाउ !

पुणे, दि. 14 (प्रतिनिधी) – आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. परंतु, वर्षातून दोन दिवस असे येतात की, या दिवशी आपली सावली दिसत नाही. काही क्षणापुरती सावली गायब होते. हा बिनसावलीचा दिवस (झीरो शॅडो डे) पुणेकरांनी सोमवारी दुपारी 12 वाजून 31 मिनिटांनी अनुभवला.
सूर्य, पृथ्वीचा मध्य आणि पुणे हे एकाच रेषेत येतात त्यावेळी सूर्य बरोबर आपल्या डो्नयावरून जातो. यावेळी उन्हात असलेल्या व्यक्तीची किंवा वस्तुची सावली पुढे-मागे न पडता खाली पायातच पडते. त्यामुळे काही क्षण सावली गायब होते. या घटनेला खगोल शास्त्र भाषेत ‘झीरो शॅडो’ असे म्हटले जाते.

या संदर्भात माहिती देताना ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे उपाध्यक्ष दीपक जोशी म्हणाले, दुपारच्या वेळी सूर्य डो्नयावर येतो, असे आपण म्हणतो. पण असे नसते. वर्षातील दोनच दिवस सूर्य डो्नयावर येतो. सूर्य रोज थोडासा उत्तर-दक्षिणेकडे असतो. त्यामुळे हा क्षण आपल्याला रोज अनुभवता येत नाही. पुण्याचे अक्षांश 18.5 असल्याने सूर्याने आज उत्तरेला मध्यबिंदू पार केला. यामुळे दुपारी 12 वाजून 31 मिनिटांनी आपली सावली गायब झाली. सूर्य 21 जूनपर्यंत कर्कवृत्तापर्यंत प्रवास करून दक्षिणेला परत ि’रला की 21 जुलैला ही घटना पुन्हा घडते. परंतु, या वेळेस भारतात पावसाळा असल्याने आपल्याला त्यावेळेस याचे निरीक्षण करता येत नाही.

सूर्य 21 डिसेंबरपासून उत्तरायण सुरू करतो, 21 मार्चला विषुववृत्त पार करून तो कर्कवृत्तात प्रवेश करतो. या दिवसाला धार्मिक व विज्ञानतही मोठे महत्त्व आहे. उजैन्नला या दिवशी धार्मिक कार्यक्रम होतात तसेच या दिवशी शात्रज्ञ सूर्याविषयीची अधिक महिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. देशातला पहिला झीरो शॅडो डे 9 एप्रिलला कन्यामुमारीला होतो नंतर तो उत्तरेकडे सरकत जातो. पंजाब, दिल्ली, बिहार, राजस्थान या राज्यात तो नसतो तर मध्य प्रदेश, गुजरातच्या दक्षिण भागात तो असतो. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात झिरो शॅडो डे अनुभवता येतो, असे जोशी यांनी सांगितले.
फोटो ओळ –
टिळक स्मारक मंदिर ः झिरो शॅडो डे निमित्त सावली गायब होण्याचा क्षण नेमका कसा असतो हे दाखविण्याची व्यवस्था ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या वतीने करण्यात आली होती. हा अनुभवण्यासाठी अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती.

Leave a Comment