पुणे, दि. 14 (प्रतिनिधी)-स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात आतापर्यंत व्यापार्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. आमच्या मागण्या रास्त आहेत. मात्र, सरकारला त्याची पर्वा नाही. त्यामुळे यापुढच्या काळात रास्ता रोको व जेल भरो स्वरुपात आंदोलन करून अधिक आक‘मक होण्याचा निर्धार आज झालेल्या सभेत करण्यात आला.
पुणे व्यापारी महासंघाने एलबीटीच्या निषेधार्थ मंगळवारी महारॅलीचे आयोजन केले होते. बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान ते झेड ब‘ीजपर्यंत बाजीराव रस्त्याने वैभव चौकातून लक्ष्मी रस्त्याने अलका टॉकीज चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली. त्यानंतर काकासाहेब गाडगीळ पुल (झेड ब‘ीज)शेजारील नदीपात्रालगतच्या मैदानात व्यापार्यांची सभा झाली.
एलबीटीविरोधात व्यापार्यांचे आता जेल भरो … आता माघार नाही या भूमिकेवर ठाम
याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, वरिष्ठ उपाध्यक्ष मुरलीभाई शहा, उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, खजिनदार फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, सहसचिव घनश्याम सुराणा व हेमंत शहा आदी उपस्थित होते.
राज्य सरकारची हेकेखोरीमुळे प्रश्न सुटत नाही सरकारने कितीही दबाव आणला व कारवाई केली तरी आता माघार घेणार नाही. यापुढे रास्ता रोको व जेल भरोसारखी आक‘मक आंदोलने करण्यात येतील. तुरुंग संपतील इतकी तुरुंगात जाणार्या व्यापार्यांची सं‘या मोठी आहे, असेही ओस्तवाल यांनी सांगितले.
मदत करणार्यांनाच मतदान!
येत्या निवडणुकीत व्यापार्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी जे प्रयत्न करतील त्यांनाच व्यापारी मतदान करतील. व्यापारी आता जागृत झाल्याने आक‘मक होत आहे. यापुढच्या काळात कोणत्याही अधिकार्याने, संघटनेने किंवा पक्षाने व्यापार्याचे दुकान उघण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा, त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागेल असे सांगून रांका म्हणाले की, सरकारने लाठ्या मारल्या वा गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही. एलबीटीसह मु‘यमंत्रीही हटाव अशी व्यापार्यांची भूमिका झाली आहे. सरकार फसवणूक करीत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी सत्य बाजू मांडावी. व्यापार्यांचा लढा शांततेच्या मार्गाने सुरु असून त्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यामुळे सरकारने कारवाई करण्याचे धाडस केल्यास व्यापार्यांना खळखट्याकचा मार्ग स्वीकारावा लागेल.
व्यापार्यांना त्यांनी गृहीत धरू नये. मु‘यमंत्र्यांच्या हटवादी भूमिकेमुळे व्यापारी व ग‘ाहकांना हा त्रास सुरु आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण चले जाव असे म्हणण्याची वेळ आली आहे, असे पाठक यांनी सांगितले. व्यापार्यांच्या बेमुदत बंद आंदोलनास इंडियन मेडिकल असोसिएशनने आज पाठिंबा दिला असून नागपूर चाळ व्यापारी संघटनेच्या 20 हजार व्यापार्यांनी त्यांच्या मोबाईल क‘मांकासह सह्या करून मु‘यमंत्र्यांना निवेदन दिले.
फ ोटो ओळ-
