रेल्वे प्रकरण: सीबीआयने घेतल्या महत्त्वाच्या फाइल्स ताब्यात

नवी दिल्ली : पवनकुमार बन्सल यांच्या राजीनाम्यानंतर सीबीआयने त्यांची कारवाई वेगाने सुरु केली आहे. बन्सल यांचा भाचा विजय सिंगला आणि निलंबित रेल्वे बोर्ड सदस्य महेश कुमार यांच्या संभाषणात उल्लेख असलेल्या प्रमोशन्स आणि टेंडरशी संबंधित फाइल्स सीबीआयने ताब्यात घेतल्या.या फाइल्समध्ये काही भ्रष्टाचार झाल्याचे आढळल्यास याप्रकरणी नव्याने गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच आगामी काळात गरज पडल्यास पवनकुमार बन्सल यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते .

सीबीआयचे विशेष पथक रेल्वे भवनात दाखल झाले. त्यांनी सिंगला आणि कुमार यांच्यात गेल्या दोन महिन्यांत झालेल्या हजारो कॉल्समधील उल्लेखांशी संबंधित प्रमोशन्स आणि टेंडरच्या फाइल्स या पथकाने ताब्यात घेतल्या.या फाइल्समध्ये काही भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे आढळतात का याची चौकशी सध्या सुरु आहे. याप्रकरणी आणखीन कोणी दोषी आढळल्यास त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तपासकामावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने या फाइल्समधील तपशीलाबाबत माहिती देण्यास सूत्रांनी नकार दिला. गरज पडल्यास पवनकुमार बन्सल यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते अशी माहिती यावेळी सूत्रांनी दिली.