मनमोहनसिंग शपथविधीला यावेत – नवाझ शरीफ

नवी दिल्ली, दि.१४ – आपल्या शपथविधी समारंभाला आपण भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांना आमंत्रित करणार आहोत असे पाकिस्तानचे नव निर्वाचित पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे.

शरीफ यांच्या पक्षाला पाकिस्तानात झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत त्यामुळे ते सरकार बनवणार असल्याचे निश्चीतत असले तरी अजून त्यांना तेथील सरकारने अधिकृतपणे सरकार बनवण्यासाठी निमंत्रित केलेले नाही किंवा निवडणूक आयोगाने हा पक्ष विजयी झाल्याची घोषणा औपचारीकपणे अजून केलेली नाही. त्याच्या आतच भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. त्या पार्श्वकभूमीवर एका भारतीय दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण भारतीय पंतप्रधानांना आपल्या शपथविधीला बोलावणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे. १९९९ साली ज्या वळणावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुटले होते तेथे पासूनच दोन्ही देशांना आता मैत्री पर्वाची नवी सुरूवात करावी लागेल असे त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान एका अमेरिकन दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अमेरिकेबरोबरचे संबंध वाढवण्याबरोबरच भारताशी अधिक उबदार संबंध निर्माण करण्यासाठी आपण उत्सुक आहोत असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि पाकिस्तान संबंधात मध्यंतरी कडवटपणा आला आहे. आपल्या पुर्वीच्या राजवटीत त्यादेशाशी पाकिस्तानचे चांगले संबंध प्रस्थापित झाले होते आता त्याही पेक्षा वेगळ्या उंचीवर आम्हला हे संबंध न्यायचे आहेत असे त्यांनी अमेरिकन दूरचित्रवाणीशी बोलताना सांगितले. दरम्यान भाजपचे नेते बलवीर पुंज यांनी मनमोहनसिंग यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की नवाझ शरीफ यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याच्या आधीच मनमोहनसिंग यांनी त्यांना भारत भेटीचे निमंत्रण देण्यात घाई केली आहे. शरीफ यांनी सत्ता स्थानी येऊन त्यांची भारतविषवयक भूमिका तपासून पाहायला हवी होती असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment