भ्रष्टाचार आरोपामुळे भुजबळांनी राजीनामा द्यावा – उद्धव ठाकरे

सोलापूर, दि.१३ – सार्वजनिक बांधकाम विभागात केवळ मीच नाही तर सर्वच जण भ्रष्टाचारी आहेत, असा दावा लाचखोर अभियंता चिखलीकर याने केला असल्याने  भुजबळ तुमच्यावरही चिखल उडाला आहे. तुमच्याच खात्याचे अधिकारी भ्रष्टाचारात गुंतले आहेत. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते सध्या सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. त्यादरम्यान ठाकरे यांनी ही मागणी केली आहे.

नाशिकमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ यांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर चिखलीकरकडे करोडोंची बेनामी संपत्ती सापडली आहे. तर अधिक चौकशी करताना स्वाती चिखलीकरच्या लॉकर्समध्ये 9 किलो सोने, चांदी तसेच लाखो रुपयांची रोकड सापडली होती. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागात केवळ मीच नाही तर सर्वच जण भ्रष्टाचारी आहेत, असा दावा लाचखोर अभियंता चिखलीकर आणि वाघ यांनी केला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री छगन भुजबळ चक्क तोंडावर पडले आहेत.

भुजबळ तुमच्यावर चिखल उडाला आहे. तुमच्याच खात्याचे अधिकारी भ्रष्टाचारात गुंतले आहेत. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, असे उद्धव म्हणाले. त्यामुळे आता भुजबळ काय प्रतिक्रिया देतात, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनीही भुजबळांना टार्गेट केले होते. एका पीडब्लुडीच्या इंजिनिअरकडे एवढी संपत्ती असेल तर पीडब्लुडीच्या मंत्र्याकडे किती संपत्ती असेल? या राज ठाकरेंच्या प्रश्नालला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी ढकलली होती. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागात सर्वच जण भ्रष्टाचारी आहेत, असा दावा चिखलीकरने केल्याने याची जबाबदारी भुजबळांची नसेल तर कुणाची आहे, असा प्रश्नप सध्या सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहे.

Leave a Comment