बिजींग, दि. १३ – चायना रेडिओ इंटरनॅशनलकडून (सीआरआय) भारतात तमिळी एफएम केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सीआरआयच्या तमिळ सेवेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चिनी रेडिओने चेन्नई येथे एफएम केंद्र सुरू करण्यात आले आहे. सीआरआयची विदेशी भाषा सेवा ऑगस्ट १९६३ मध्ये सुरुवात झाली होती. तमिळनाडूमध्ये ही कंपनी अगोदरच लघुलहरी (एसडब्ल्यू) सेवा पुरवते आहे.
चिनी एफएम रेडिओचे भारतात तमिळ केंद्र
राज्यातील एफएम केंद्रांसोबत वितरणासंबंधी आमची बोलणी सुरू आहेत, असे चाय जन अका वॅनी यांनी सांगितले. सीआरआयकडून हिंदी, बंगाली, उर्दू भाषेतून देखील सेवा दिली जाते. २००९ पासून सीआरआय मोबाइल सेवा सुरू आहे. सीआरआयची स्थापना ३ डिसेंबर १९४१ मध्ये झाली होती. सध्या या रेडिओमार्फत जगभरातील एकूण ६३ भाषांतून सेवा दिली जाते.
