मुंबई अब्जाधीशांच्या यादीत जगात सहावी

मुंबई दि.१३ – जगातील सर्वाधिक अब्जाधीश असणार्‍या टॉप टेन शहरात महाराष्ट्राच्या मायानगरीने म्हणजे मुंबईने सहाव्या स्थानावर नांव कोरले आहे. या मुंबापुरीत २६ अब्जाधीश आहेत असे अतिश्रीमंतांच्या संपत्तीचा अभ्यास करणार्याआ वेल्थ इनसाईट या संस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. विशेष म्हणजे या यादीत भारतातील फक्त मुंबईचाच समावेश आहे.

या यादीत जगात प्रथम क्रमांकावर आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर. येथे ७० अब्जाधीश राहतात. तर त्यापाठोपाठ मास्को ६४, लंडन ५४, हाँगकाँग ४० तर बिजिंग शहरात २९ अब्जाधीश आहे. मुंबईनंतर सातव्या क्रमांकावर आहे शांघाय २३, नंतर पॅरिसचा नंबर असून येथे २२ अब्जाधीश राहतात.

या अहवालात असेही निरीक्षण नोंदविले गेले आहे की अमेरिकेला अब्जाधीशांच्या संख्येत मागे टाकून चीनची वेगवान दौड सुरू असून २०२० पर्यंत जपान व जर्मनीला मागे सारून चीन पहिल्या क्रमांकावर येईल. याच काळात भारतही आपल्या सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर जाण्याची शक्यता असल्याचेही संस्थेने नमूद केले आहे.

Leave a Comment