महेंद्रसिंग धोनी विरुद्ध खटला

बंगलोर: हिंदू देवतेचा अपमान आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीविरोधात बंगलोरच्या कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बंगलोरचे अडिशनल मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट छोरी खान यांनी कलम २९५ तसंच ३४ अंतर्गत खटला दाखल केला आहे. भावना दुखावल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आला असून त्यावरिल सुनावणी लवकरच सुरु होणार आहे.

काही दिवसापूर्वी बेंगलोर येथील सामाजिक कार्यकर्ते जयकुमार हिरेमठ यांनी बंगलोरच्या कोर्टात याचिका दाखल केली होती. टीम इंडियाचा कर्णधार धोनीकडून एका हिंदू देवतेचा अपमान झाल्याचा आरोप करत हिरेमठ यांनी बंगलोरच्या कोर्टात३४ अंतर्गत खटला दाखल केला आहे.

टीम इंडियाचा कर्णधार धोनीला विष्णू देवतेच्या रूपात एका इंग्रजी मासिकात चित्रित करण्यात आले होते. धोनीच्या हातात बुटांसह विविध ब्रँड्सशी संबंधित वस्तू घेतल्याचे दाखवण्यात आले होते. धोनीने या फोटोच्या माध्यामातून धार्मिक भावना दुखावल्या आहेत असे याचिकाकर्त्यांचे म्हणने होते. याप्रकरणी बंगलोरचे अडिशनल मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट छोरी खान यांनी कलम २९५ तसेच ३४ अंतर्गत खटला दाखल केला आहे. त्यामुळे आता याप्रकरणी कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment