रोम, दि. १३ – पोप जॉन पॉल द्वितीय यांच्यासारखी चेहरेपट्टी असणारा आणि रस्त्यावर कसरती करून पोटाची खळगी भरणार्या एका बहुरुपी कलाकाराला कॅथलिकांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप यांच्यासारखा पांढरा वेष परिधान केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली.
हा कलाकार बराच काळ रोमच्या रस्त्यांवरून फिरत होता. त्याला पाहिल्यानंतर अनेकांना पुन्हा पोप अवतरल्याचा भास झाला. मात्र, पोपच्या नावाखाली हा कलाकार पैसे मागत असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांनी याबबत सखेद आश्चर्य व्यक्त केले. हा पोप जॉन पॉल द्वितीय यांचा अपमान असल्याचे वाटून काहींनी हा प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली आणि पोलिसांनी या भामट्याला अटक केली आहे.
बहुरुप्याच्या वेषातील बनावट पोपला अटक
आपला हेतू फक्त पोटाची खळगी भरण्याचा होता, असे या व्यक्तीने पोलिसांना सांगितले, मात्र पोपसारखे वेषांतर करुन भीक मागितल्याबद्दल पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.