देशात २२ खास कोर्टाची स्थापना

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसापासून सीबीआय खटल्यांचा निकाल वेळेवर लागण्यास दिरगाई होत असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) तपास करून कोर्टात दाखल केलेल्या खटल्यांचा निकाल तातडीने लागावा, यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार देशात २२ खास कोर्टाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यापैकी तीन कोर्ट महाराष्ट्रात असून मुंबईत एक आणि नागपूरला दोन कोर्ट असणार आहेत. या कोर्टांसाठी न्यायाधीशासकट १५ नव्या पदांना विधि व न्याय खात्याने मान्यता दिली आहे .

सीबीआय जयपूरविरुद्ध सौरिन रसिकलाल शहा व इतर खटल्याची सुनावणी करताना , सुप्रीम कोर्टाने सीबीआय खटल्यांचा निकाल वेळेवर लागण्यासाठी विविध राज्यात २२ कोर्ट आठ आठवड्याच्या आत कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने देशात २२ खास कोर्टाची स्थापना करण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार राज्यात तीन सीबीआय खटल्यांची विशेष कोर्ट निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या काळात या तीन कोर्टात केवळ सीबीआयतर्फे दाखल करण्यात आलेल्या खटल्यांची सुनावणी होणार असल्याचे समजते.