चित्रांगदा सिंग घटस्फोटाच्या उंबरठ्यावर

नवी दिल्ली, दि. १३ – हॉट, बोल्ड ब्युटी चित्रांगदा सिंग आणि ज्योती रंधवा आता कायदेशीर काडीमोड घेण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी दोघांनी गुरगाव कोर्टात अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी दिलेल्या अर्जात या दोघांनी म्हटले आहे की, आम्ही दोघे आमच्या मर्जीने वेगळे होण्याचा निर्णय घेत आहोत.

चित्रांगदा सिंग सध्या मुंबईत राहते. तिचा पती गोल्फपटू ज्योती रंधवा दिल्लीत राहतो. चित्रांगदा बॉलिवूडमध्ये इतकी व्यस्त राहते की, तिला आपल्या पाच वर्षांच्या मुलाला व पतीला भेटायला वेळच मिळत नाही. यावरून या दोघांत कित्येक वेळा वाद झाल्याचे पुढे आले होते. मात्र, प्रत्येक वेळी आणखी एक संधी म्हणत, हे नाते टिकून राहिले. मात्र, आता हे दोघे एकत्र राहू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरगाव कोर्टाने त्यांना नोव्हेंबरची तारीख दिली आहे. चित्रांगदा आणि ज्योती रंधवा यांच्यात आता मुलावरून वाद झाला आहे. रंधवा चित्रांगदाला आपल्या मुलाला भेटू देत नाही. या दोघांचे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तसेच चित्रांगदाला रंधवा यांच्यापासून जोरावर नावाचा एक मुलगा आहे.

Leave a Comment