नवी दिल्ली – भ्रष्टाचार व घोटाळ्यांच्या करणावरून पवनकुमार बन्सल व अश्वनी कुमार या पंतप्रधानांच्या निकटच्या मंत्र्यांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वागळले. त्यामुळे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग थोडेसे अस्वस्थ झाले आहेत. दोन मंत्र्यांच्या हकालपट्टीनंतरही भ्रष्टाचार व घोटाळ्यांच्या गर्तेत सापडलेल्या यूपीए सरकारपुढील अडचणी अजूनही कायम आहेत.
केंद्र सरकारपुढील अडचणी वाढल्या
पंतप्रधान डॉ. सिंग यांना पंजाबमधील आपल्या या दोन निकटच्या मंत्र्यांसाठी यांनी बचावाची ढाल केली खरी; पण, खुद्द सोनियांनीच हस्तक्षेप करीत, मंत्रिपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यास सिंग यांना भाग पाडले . त्यामुळे सोनियांकडील पंतप्रधानांचे राजकीय वजन कमी झाल्याचा संदेश काँग्रेसमध्ये पोहोचला आहे . परिणामी , मनमोहन यांची मंत्रिमंडळावरील पकडही सैल होण्याची चिन्हे राजकीय धुरीण व्यक्त करीत आहेत. आगामी मंत्रिमंडळ फेरबदलात त्याची झलक पाहायला मिळण्याची शक्यताही व्यक्त होत आहे .
सी. पी. जोशींकडे रेल्वे, सिबल यांच्याकडे कायदा मंत्रालय बन्सल व अश्वनी कुमार यांच्या राजीनाम्यामुळे तात्पुरती सोय म्हणून रेल्वे व कायदा मंत्रालयाचा कार्यभार अनुक्रमे वाहतूकमंत्री सी. पी. जोशी व दूरसंचारमंत्री कपिल सिबल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे . तृणमूल काँग्रेसने यूपीए सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर पक्षाच्या मुकुल रॉय यांच्याकडील रेल्वेमंत्रिपद काही काळ जोशी यांच्याकडे सोपवण्यात आले होते.