नृत्य आणी अभिनयाने सर्वाना वेड लावणारी बॉलीवुडची धक धक गर्ल माधुरी पुन्हा एकदा जुन्या अंदाजात दिसणार आहे. तिने पूर्वी ‘देवदास’ या सिनेमातील ‘मार डाला’ या गाण्यावर सर्वाना मंत्रमुग्ध केले होते. आता लवकरच माधुरी दीक्षित पुन्हा एकदा मुजरा करणार आहे.

सिनेनिर्माता विशाल भारद्वाजच्या ‘डेढ़ इश्किया’ या सिनेमात माधुरी ‘आपके करार में’ या गाण्यावर नृत्य करणार आहे. या गाण्यात तिच्यासोबत पंडित बिरजू महाराज पण दिसणार आहेत. याला संगीत विशाल भारद्वाजने दिले आहे. याबाबत बोलताना फिल्म निर्माता केतन मारू म्हणाले की, या सिनेमाची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर हे गाणे शुट करण्यात येणार आहे.
या गाण्याची शूटिंग मोठ्या सेटवर करण्यात येणार आहे. हे गाणे विशाल भारद्वाजने कंपोज की आहे. ‘डेढ़ इश्किया’ हा सिनामा सुपरहिट सिनामा ‘इश्किया’ चा सीक्वल आहे. या सीक्वलमध्ये नसीरुद्दीन शाह, अरशद वारसीसोबतच माधुरी दीक्षित, हुमा कुरैशी झळकणार आहेत.