सनीचा धसका घेतला दिग्गज मंडळींनी

पोर्न सिनेमाची नायिका सनी लियोन सध्या भलतीच फॉर्ममध्ये आहे. बॉलीवुडमध्ये तिने अभिनयाच्या जोरावर स्वताचे स्थान निर्माण केले अहे. त्यामुळे नवीन अभिनेते सनी सोबत काम करण्यास उत्सुक आहेत. तर दुसरीकडे मात्र बॉलीवुडमधील अनेक दिग्गज मंडळींनी मात्र सनी लियोन सोबत काम करण्यास नकार दर्शविला आहे.

सध्या तिच्या कामामुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री सनी लीयोनाला मात्र बॉलीवूडमध्ये अनेक ऑफर येत आहेत. आगामी काळात सनी लियोन ‘वेलकम’ या सिनेमाच्या सीक्वल मध्ये मल्लिका शेरावतची भूमिका करणार होती. मात्र नाना पाटेकरने तिच्या सोबत काम करण्यास नकार दर्शविला आहे. नानाच्या पूर्वी संजय दत्तने तिच्या सोबत काम करण्यास नकार दर्शविला होता.

काही दिवसापूर्वी अनिल कपूरने पण सनी सोबत काम करण्यास नकार दर्शविला होता. या दोन्ही अभिनेत्याच्या मते त्यांना एक फैमिली इमेज आहे. त्यांनी जर आगामी काळात सनी लियोन सोबत काम केल्यास त्याची इमेज खराब होईल असे त्यांचे मत आहे. नाना आणि अनिल कपूरणे ही बाब निर्माता फिरोजला कळवली आहे. त्यामुळे फिरोजने आता विचार करणे सुरु केले असून यामुळे सनी लियोन मात्र नज नाराज झाली आहे.

Leave a Comment