कर्नाटक मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या आघाडीवर

बंगळुरू: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कॉंग्रेसचे दलित नेते के. सिद्धरामय्या यांचे नाव पुढे आहे. त्यांच्याबरोबर केंद्रीय कामगार मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव स्पर्धेत आहे. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाचे नाव शुक्रवारी निश्चित करण्यात येईल.

नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा पराभव करून बहुमत प्राप्त केले आहे. शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या १२१ आमदारांची बैठक होत असून या बैठकीत आमदारांचे मत आजमावून ए. के. एन्थोनी यांच्या नेतृत्वाखालील केंदीय समिती मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित करतील.

या पदासाठी प्रमुख दावेदार असलेले सिद्धरामय्या हे कर्नाटक विधानसभेत पाच वेळा निवडून आले असून भाजप सरकारच्या कार्यकाळात विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे. राज्यात मोठ जनाधार असलेले नेते म्हणून त्यांचा लोकिक आहे. केवळ माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पक्षातून सहा वर्षापूर्वी काँग्रेस पक्षात सिद्धरामय्या यांनी केलेला प्रवेश हा एकमेव नकारात्मक मुद्दा आहे.

सिद्धरामय्या यांचे प्रमुख स्पर्धक खर्गे हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून पक्षात कार्यरत असून असून त्यांनी गुलबर्गा मतदारसंघातून सलग नऊ वेळा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. एकदाही पराभूत न झालेल्या आणि दीर्घकाळ नेतृत्वाच्या स्पर्धेत राहिलेल्या खर्गे यांची केंद्रीय नेतृत्वाने नेहेमीच उपेक्षा केली आहे.

Leave a Comment