
नवी दिल्ली, दि. 9 – भाच्याशी संबंधित लाचखोरी प्रकरणावरून टीकेचे लक्ष्य ठरलेले रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून दूर राहिले. त्यामुळे बन्सल मंत्रिपद सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
नवी दिल्ली, दि. 9 – भाच्याशी संबंधित लाचखोरी प्रकरणावरून टीकेचे लक्ष्य ठरलेले रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून दूर राहिले. त्यामुळे बन्सल मंत्रिपद सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
रेल्वे बोर्डाचे निलंबित सदस्य महेशकुमार यांनी वरिष्ठ दर्जाचे पद मिळवण्यासाठी 10 कोटी रुपयांच्या लाचेचा व्यवहार निश्चित केला. त्यातील 90 लाख रुपये बन्सल यांचा भाचा विजय सिंगला याला देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यावरून विरोधकांनी बन्सल यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अर्थात, काँग्रेस नेते असणार्या बन्सल यांनी कुठली चुकीची कृती केल्याचा इन्कार केला आहे. याशिवाय, सिंगलाशी कुठला व्यावसायिक संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, रेल्वेशी संबंधित लाचखोरी रकरणावरून केंद्र सरकारचे नेतृत्व करणार्या काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर, बन्सल आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून दूर राहिल्याने त्यांच्याबाबतच्या चर्चांना उधाण आले. बन्सल मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या अटकळी त्यामुळे सुरू झाल्या.ममात्र, प्रकृती ठीक नसल्यामुळे बन्सल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला गेले नाहीत, असे मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे रेल्वेशी संबंधित कुठला विषय नसल्याकडेही यासूत्रांनी लक्ष वेधले. बन्सल आज त्यांच्या कार्यालयातही गेले नाहीत. ते दिवसभर त्यांच्या अशोका रोड निवासस्थानीच होते, असे स्पष्ट झाले. सीबीआयकडून बन्सल यांच्या
स्वीय साहाय्यकाची चौकशी रेल्वेशी संबंधित लाचखोरी प्रकरणावरून आज सीबीआयने बन्सल यांचे स्वीय साहाय्यक राहुल भंडारी यांची चौकशी केली.