नाइट रायडर्सचा वॉरियर्सवर विजय

पुणे- आयपीएलच्या सहाव्या हंगामात गुरुवारी झालेल्या सामन्यात कोलकातानाइट रायडर्सने पुणे वॉरियर्सवर 46 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजीकरत कोलकाताने पुण्यापुढे 153 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र पुण्याचा डाव 106 धावांवर संपुष्ठात आला. दोन्ही संघाच्या प्लेऑफमधील आशा जवळपास संपल्याने आता प्रतिष्ठा राखण्यासाठी हा सामना महत्त्वाचा होता. त्यात कोलकाताने बाजी मारली.

कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाज करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने
कर्णधार गौतम गंभीरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर वीस षटकात सहा बाद 152
धावा केल्या. पुण्याकडून भुवनेश्वर कुमारने तीन गडी बाद केले. स्पर्धेत पुण्याच्या फलंदाजांना उत्तम कामगिरी करता आली नव्हती. याही सामन्यात पुन्हा पुण्याचे फलंदाज अपयशी ठरले. अजोलो मॅथ्यूज(44) आणि रॉबिन उथ्थपा (31) अपवाद वगळता अन्य एका ही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या
करता आली नाही. पुण्याचा डाव 106 धावात संपुष्ठात आला.

Leave a Comment