हिंदी, मराठी चित्रपट आणि नाटयसृष्टीत आपली जबरदस्त मोहोर उमटवणारे
अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी आता आपला मोहरा
छोटया पडद्याकडे वळवला आहे. महेश मांजरेकर प्रथमच मराठी टेलिव्हिजनच्या
क्षेत्रात आपले पदार्पण केले असून लवकरच आपली पहिलीवहिली मालिका घेऊन ते
दाखल होतायत. ‘तुझं माझं जमेना` ही महेश वामन मांजरेकर कृत मालिका झी
मराठीवर 13 मे पासून सोमवार ते शनिवारी रात्री नऊ वाजता रुजू होत आहे.
‘तुझं माझं जमेना’ १३ मे पासून
मराठी चित्रपट आणि नाटय निर्मिती नंतर मालिकांकडे आपला मोहरा
वळवण्याबाबत महेश मांजरेकर सांगतात की, मराठी चित्रपट आणि नाटकांचा
प्रेक्षक जसा आज बदलतो आहे तसा टेलिव्हिजनचा प्रेक्षकही बदलतो आहे.
टेलिव्हिजन हे प्रामुख्याने बायकांचं माध्यम आहे, हे जरी खरं असलं तरी या
प्रेक्षकाला रोजच्या रोज छोटया पडद्याकडे खिळवून ठेवण्याचं काम सोपं
नाही. शिवाय विविध वाहिन्यांच्या गदारोळात ठराविक कार्यक्रमाचीच
प्रेक्षकांनी निवड करावी, यासाठी निर्मात्याची आणि अर्थात वाहिनीची कसोटी
लागते. षिवाय आज ज्या वेगाने टेलिव्हिजन विस्तारतंय, इंडस्टी म्हणून आजची
त्याची व्याप्ती पाहता मीच काय अनेक मोठे बॉलीवूडचे दिग्दर्षक आणि
निर्माते देखिल टेलिव्हिजनकडे वळू लागलेयत. व्यवसायाचा मुद्दा बाजूला
ठेवला तरी कलात्मक दृ”टयाही मला हे माध्यम अधिक आव्हानात्मक वाटतं. आपणही
ते आव्हान स्वीकारुन बघायला हरकत नाही, असा विचार मनात आला आणि झी
मराठीमुळे ते आव्हान मी अंगावर घेतलं. अर्थात इथे सर्वात अधिक कष्ट आणि
व्याप आहेत. एखादा चित्रपट प्रदर्षित झाला किंवा नाटक मंचावर आणलं की आपण
त्यातून बाजूला होतो, इथे रोज प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यासाठी रोजची
वेगळी परीक्षा आहे. त्या अर्थाने हे खूप थकवणारं माध्यम आहे, असंही मी
म्हणेन.
टेलिव्हिजनचा पडदा आज छोटा राहिलेला नाही. विषय, ग्लॅमर, तंत्र सगळंच
चित्रपटांसारखं मालिकांमध्ये पहायला मिळतंय. माइया मालिकेतही मी कुठलीही
तडजोड स्वीकारलेली नाही. या मालिकेत प्रेक्षकांना चित्रपटाप्रमाणेच
दर्जेदार निर्मितीमूल्ये, कसदार अभिनय, खरीखुरी घरं, नयनरम्य लोकेषन्स
पहायला मिळणार आहेत. पहिल्यांदाच मराठी मालिकेत प्रेक्षकांना
स्वित्झर्लंडची नेत्रदीपक लोकेषन्स या मालिकेतून दिसणार आहेत.
‘तुझं माझं जमेना` ही मालिका नावावरुनच सासू सुनेच्या नात्यातली गंमत
सांगणारी मालिका आहे. हे प्रेक्षकांच्या ध्यानात आलंय. तरी इतर
मालिकांपेक्षा ही मालिका निष्चितच वेगळी असेल, असा दावा महेश मांजरेकर
यांनी केला. ते म्हणतात, ही आजच्या काळातल्या सासू सुनेची गोष्ट आहे. या
सासू सुनांच्या एकमेकींबाबत कुरबुरी नक्की असतील पण त्या परस्परांच्या
विरोधात कट कारस्थानं करणा-या नाहीत. खरं पाहता या सासू सुनांपेक्षा
दोघींच्या मध्ये अडकलेल्या पुरूषाची ही कथा आहे. ज्याला आईचं म्हणणं
पुरेपूर पटतं आणि बायकोलाही दुखवायचं नसतं. सासूसुनेच्या वादविवादात
फसलेल्या मुलाची ही कथा. तरी ती अधोरेखित करते ते सासू सुनांचंच विश्व!
दोघींच्या नात्यांचे अर्थ उलगडून दाखवणारी, आणि मानवी स्वभावाचे कंगोरे
अधोरेखित करणारी ही मालिका आहे. आपल्या मतांशी ठाम असणारी, शिस्तप्रिय,
करारी आणि मनाने तितकीच हळवी, प्रेमळ अषी सासू यात रंगवलीय ज्ये”ठ
अभिनेत्री रीमा यांनी. रीमाताई छोटया पडद्यावर आणि तेही मराठी मालिकेत
अनेक वर्षांनी पहायला मिळणार आहेत. मनवा नाईक त्यांच्या सुनेच्या भूमिकेत
दिसणार आहे. मनवा देखिल झी मराठीच्याच ‘आभाळमाया` नंतर मालिकेत काम
करतेय.
‘तुझं माझं जमेना` मध्ये रीमा आणि मनवा यांच्याबरोबर महत्त्वाच्या
भूमिकेत वैभव तत्ववादी आहे. आई आणि बायको यांच्यात अडकलेल्या नव-याची
भूमिका तो साकारतोय. मनवा आणि वैभव यांची पडद्यावरची केमिस्ट्री उत्तम
जुळलीय. यांच्याशिवाय सुहास जोशी, सविता मालपेकर, विद्याधर जोशी,
भालचंद्र कदम, अभिजीत केळकर, पूर्णिमा मनोहर, श्रीधर भावे वगैरे
कलावंतांच्या भूमिका आहेत. 13 मेपासून सोमवार ते शनिवारी रात्री नऊ वाजता
रसिकांना आजच्या काळातल्या सासू सुना भेटायला येणार आहेत, फक्त झी
मराठीवर!!!!