झाडूने मार खात होती कंगना

ही गोष्ट कोणालाच माहिती नसेल बॉलीवुडची सेक्सी लुक असलेली अभिनेत्री कंगना राणावत लहानपनी झाडूने मार खात होती. कंगनाला तिची आई लहनपणी काही तरी चूक केल्यास झाडूने मारत होती असे खुद कंगनानेच एका कार्यक्रम प्रसंगी सांगितले.

यावेळी बोलताना कंगना म्हणाली, लहान मुलांना आईने दिलॆले प्रेम आता एखादी विशेष शिकवण आज ही आठवणीत राहते. मात्र लहानपणी मात्र आईला मी खूप घाबरत होते. बॉलीवुडमध्ये मिळालेल्या सफलतेचे सारे श्रेय तिने आपल्या आईला दिले. परिस्थितिमूळे संघर्ष करण्याची प्रेरणा प्रदान करीत आहे. बॉलीवुडशिवाय मी अन्य कुठल्या क्षेत्रात असली असती तर यश संपादित केले असते.’

कंगनाला तिच्या आईने सर्व कामे शिकवली आहेत. तिला स्वयपाक व भांडे धुवयाला येतात. आईमुळे तिला बरेच काही शिकायला मिळाले आहे. राष्ट्रीय फिल्म फेयर पुरस्कार विजेता असलेल्या कंगनाने २०० ६ मध्ये ‘ गैंगस्टर’ या सिनेमातून बॉलीवुडमध्ये एन्ट्री केली होती. कंगना राजपूत परिवाशी संबंधीत आहे. तिची आई स्कूलमध्ये संस्कृतची शिक्षिका होती. कंगनाचा ‘शूट आउट एट वडाला’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. लवकरच येत असलेल्या ‘आय लव न्यू ईयर’ या सिनेमात अभिनेता सन्नी देओल सोबत ती झळकणार आहे.

Leave a Comment