स्टंट करताना करीना झाली जखमी

आगामी काळात येत असलेल्या ‘गोरे तेरे प्यार में’ या सिनेमात एक रोप वॉकिंग सीन आहे. हा स्टंट सीन करण्याच्या नादात अभिनेत्री करीना कपूर जखमी झाली आहे. तसे पहिले तर तिची ही जखम मामूली आहे. मात्र करीनाला आगामी काळात शुटला एक दोन दिवस सुट्टी घ्यावी लागणार आहे. या पूर्वी तिने ‘एजेंट विनोद’ या सिनेमाच्या शूटिंग वेळी जोरदार स्टंट केले होते. मात्र यावेळेस तिला जखमी व्हावे लागले.

‘गोरे तेरे प्यार में’ या सिनेमाचा एक स्टंट सीन होता. त्याचे शूट स्वतः करीनाने करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा सीन करीत असताना ती जखमी झाली. हा सीन करण्यापूर्वी त्यासाठी ती बॉडी डबलची मदत घेऊ शकली असती. मात्र या सिनेमाचा हीरो इमरान खानने पण तिला सीनपूर्वी न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र तिने कोणचेच ऐकले नाही. त्यामुळे तिला हा सीन करीत असताना जखमी व्हावे लागले.

शूट पूर्वी बेबोला दिग्दर्शक पुनीत मल्होत्राने हा स्टंट सीन कठिन काम असल्याचे सांगितले होते. मात्र हा सीन करण्यासाठी तिने स्वताचा जीव पण धोक्यात घातला. रोपवरून वॉकिंग करीत असताना बेबो जखमी झाली. मात्र तिला यावेळी खूप मार लागला नाही. अन्यथा ती जखमी झाली असती तर सिनेमाचे शूट बराच काळ रखडले असते.

Leave a Comment