कर्नाटकात मु‘यमंत्रिपदासाठी सुरू असलेल्या शर्यतीत सिद्रामय्या हे आघाडीवर आहेत. या पदासाठी जुन्या आणि जाणत्या काँग‘ेस नेत्यांत स्पर्धा लागली आहे पण, त्या सर्वांवर मात करून तुलनेने कमी वयाचे नेते सिद्रामय्या यांची या पदावर वर्णी लागेल असे दिसायला लागले आहे. पक्षश्रेष्ठी म्हणतील तो नेता या पदावर बसेल असे सर्वांनी स्पष्ट केले असले तरीही सिद्रामय्या यांनी आपला दावा तीव‘तेने मांडला असून, पक्षश्रेष्ठींच्या आशीर्वादाने आपणच मु‘यमंत्री होणार असे बजावले आहे. पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने सर्व जण आनंदात असले तरीही आता मु‘यमंत्रीपदाच्या स्पर्धेमुळे पक्षात कटुता वाढते की काय असे वाटायला लागले आहे. मु‘यमंत्री निवडताना पक्षातल्याच लोकांची मनधरणी करावी लागत आहे. कारण या पदासाठी अनेक लोक उत्सुक आहेत. मु‘यमंत्रिपदास आतुर झालेल्या एकेकाची समजूत काढून एकाची निवड करताना पक्षाच्या केन्द्रीय नेत्यांना नाकी नव येत आहेत. कर्नाटकात निवडणुकीच्या आधीपासूनच काँग‘ेसच्या हातात सत्ता जाणार याचे संकेत मिळत होते. त्यामुळे गेल्या वर्षाभरापासून अनेकांनी मु‘यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती.
साधारणत: विरोधात असताना ज्या नेत्याकडे विरोधी नेतेपद असते तोच मु‘यमंत्रीपदाचा दावा करतो कारण विरोधी पक्ष म्हणून काम करताना नकळतपणे एक शॅडो मंत्रिमंडळ तयार होत असते. त्याचा मु‘यमंत्री तोच असतो. म्हणून विरोधी नेते असलेल्या सिद्रामय्या यांनी मु‘यमंत्रिपदासाठी आपला दावा केलाही आहे. ते मागासवर्गीय आहेत आणि कर्नाटकात काँग‘ेसच्या हक्काच्या मतांत मागासवर्गीय आणि मुस्लिम मतांचा मोठा भरणा असतो. उच्चवर्णीयांपैकी लिंगायत आणि वक्कलीग या जाती काँग‘ेसपासून दूर असतात. तेव्हा आपल्या ही मतपेढी कायम टिकवण्यासाठी काँग‘ेस पक्षा आपल्यालाच मु‘यमंत्री करणार असा सिद्रामय्या यांचा विश्वास आहे आणि त्यांच्या समर्थकांनाही तशीच खात्री आहे. त्यामुळे आता कर्नाटकाच्या काँग‘ेसमध्ये या पदावरून सुरू असलेल्या संघर्षाचे केन्द्र सिद्रामय्या यांच्याच घरात निर्माण झाले आहे. तिथे त्यांच्या समर्थकांनी गर्दीही केली आहे. सिद्रामय्या यांच्या या दाव्याला अनेक पदर आहेत. पहिला म्हणजे ते मुळातले काँग‘ेसचे कार्यकर्ते नाहीत. ते मुळातले जनतादलाचे आहेत. ते काही काळ रामकृष्ण हेगडे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत होते. नंतर त्यांनी जे. एच. पटेल यांच्या मंत्रिमंडळात उपमु‘यमंत्री म्हणून काम केलेले आहे.
2004 साली कर्नाटकात काँगे‘स आणि जनता दल यांचे संयुक्त सरकार सत्तेवर आले तेव्हा धरमसिंग यांच्या सरकारमध्ये ते पुन्हा उपमु‘यमंत्री झाले आणि त्यांनी अर्थ खातेही सांभाळले. ते मंत्रिमंडळात जनता दलाचे प्रतिनिधी म्हणून सामील झाले होते. त्यामुळे या पक्षाचे स्वतंत्रसरकार येईल तेव्हा आपल्याला मु‘यमंत्रिपदाचा लाभ व्हावा असे त्यांना वाटले तर त्यात काही चूक नाही. 2006 साली देवेगौडा यांच्या हातात सत्ता आलीसुद्ध पण तेव्हा त्यांनी सिद्रामय्या यांना मु‘यमंत्री न करता आपल्या मुलाला एच. डी. कुमारस्वामी याला तो मान दिला. तेव्हा सिद्रामय्या जनता दलातून बाहेर पडले आणि काँग‘ेसमध्ये दाखल झाले. ते अभ्यासू नेते म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांनी गेली सात वर्षे विरोधी पक्ष नेता म्हणून तर छान काम केले आहेच पण या काळात पक्षाचेही काम चांगले केले. काँग‘ेस पक्ष सत्तेच्या बाहेर असला तरीही त्यांनी गेल्या सात आठ वर्षात पक्षातला आत्मविश्वास कायम टिकवण्यासाठी मोठेच काम केले आहे. म्हणून त्यांचा मु‘यमंत्रीपदावर यथार्थ दावा आहे. पण त्याना अजूनही काही काँग‘ेस नेत्यांचा विरोध आहे. ते दुसर्या पक्षातून आले आहेत या मुद्यावरून विरोध करायला सुरूवात केली आहे.
काँग‘ेस श्रेष्ठींना दलित समाजातलाच कोणी तरी मु‘यमंत्री करायचा असेल तर त्यांनी वीरप्पा मोईली किंवा मल्लिकार्जुन खर्गे यातल्या एकाला मु‘यमंत्री करावे अशी मागणी करण्यात येत आह. कारण ते अनुभवी आहेत आणि आता केन्द्रात मंत्रीपदावर आहेत. या दोघांनी या पदावर गेल्या किमान 20 वर्षांपासून डोळा ठेवलेला आहे. पण आता त्यांना केन्द्रात चांगली संधी मिळाली आहे. त्यांना केन्द्रातून राज्यात पाठवले जाण्याची शक्यता कमीच आहे कारण केन्द्रातही चांगल्या अनुभवी मंत्र्यांची वानवा आहे. एकंदरीत सिद‘ामय्या यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. पण काही सूत्रांनी अन्यही काही नावे चर्चेत असल्याचे म्हटले आहे. त्यात प्रदेश काँगे‘सवे आताचे अध्यक्ष आर.व्ही. देशपांडे, माजी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, शिवशंकरप्पा आणि अन्यही काही नावे आहेत पण हे उमेदवार गंभीर नाहीत. पण काँग‘ेसमध्ये काहीही घडू शकते. काँग‘ेसला सध्या स्वच्छ प्रतिमेच्या मु‘यमंत्र्याची गरज आहे. कारण कार्यक्षमतेपेक्षा भ‘ष्टाचार मुक्त कारभाराला पक्षात महत्त्व दिले जात आहे. काही विपरीत न घडल्यास सिद्रामय्या हे मु‘यमंत्री होणार हे नक्की आहे. त्यांना मु‘यमंत्री न केल्यास कर्नाटकात काँग‘ेसला भविष्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल.