क्रांती रेडकर दिग्दर्शनाच्या वाटेवर…

भारतीय सिनेसृष्टीला १०० वर्ष पूर्ण झाल्याचे एक अनोखे औचित्य साधून
अभिनेत्री क्रांती रेडकरने आता दिग्दर्शनात आपले पाऊल ठेवले आहे. “सून
असावी अशी” या आपल्या पहिल्या -वहिल्या फिल्मने क्रांती रेडकरने
सिनेसृष्टीतील अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर शहाणपण देगा देवा ,
ऑन ड्युटी २४ तास, जत्रा, फक्त लढ म्हणा, तीन बायका फजिती ऐका, नो एट्री
पुढे धोका आहे, पिपाणी यासारख्या एकापेक्षा एक सरस सिनेमांमधून क्रांतीने
आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली. “कोंबडी पळाली” या तिच्या दिलखेचक
नृत्यावर तर तिने तमाम रसिकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावला.

आता हीच क्रांती रेडकर दिग्दर्शनात उतरली आहे. कृष्णराज फिल्म्सच्या
सचिन शिंदे यांच्या ” काकण ” या सिनेमाचे क्रांती दिग्दर्शन करणार आहे.
सिनेनिर्मिती क्षेत्रातील कृष्णराज फिल्म्सचे हे पहिलेच पाऊल आहे. .
नुकताच या सिनेमाचा मुहूर्त (आज ७ मे) मुंबई येथील मढ आयलंड येथे झाला.

सिनेमाचा पहिला क्लॅप नीलकंठ धुरी ( महाराज ), हर्षल कोठारे, आप्पा
काळसेकर याच्या हस्ते देण्यात आला. य़ावेळी क्रांती रेडकर, सचिन शिंदे,
ओमकार मंगेश दत्त तसेच सिनेमातील प्रमुख जोडी जितेंद्र जोशी, उर्मिला
कानेटकर – कोठारे, बालकलाकार आशुतोष गायकवाड आणि इतर तंत्रज्ञ मंडळी
उपस्थित होती. ह्या सिनेमाबाबत सांगायचे झाले तर ही एक लव्ह स्टोरी
असून याची कथा क्रांती रेडकरने स्वतः लिहिली आहे तर पटकथा- संवाद – गीते
ही क्रांती रेडकर आणि ओमकार मंगेश दत्त यांची आहेत. सिनेमाचे संगीत अजय
सिंघा यांचे आहे तर सिनेमॅटोग्राफर म्हणून बिथिन दास काम पाहणार आहेत
<