सलमान करणार ओलियासोबत लग्न

बॉलीवुडचा मोस्ट एलिजेबल बैचलर असेल्या सलमान खानच्या आयुष्यात अनेक सुंदर तरुणी आतापर्यंत आल्या. मात्र, तरीपण सलमानने आतापर्यंत लग्न केले नाही. काही दिवसापुर्वी सलमानचा कैटरीना कैफ सोबत रोमान्स सुरु असल्याची चर्चा होती त्यातच ब्रेकअपची देखील बातमी आली. त्यामुळे सलमान कोणासोबत लग्न करणार याची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरु आहे. सलमानच्या लाइफमध्ये पुन्हा एकदा सुंदर युवतीचे आगमन झाले असून तो तिच्या सोबत लग्न करण्याचा विचार करीत असल्यची चर्चा आहे.

सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार सध्या एक मिस सलमानसोबत दिसत आहे. गेल्या काही दिवसात दोघानी एकत्र वेळ घालवली आहे. त्यामुळे ही युवती कोण असेल याची उत्सुकता सर्वाना लागली आहे. ही युवती म्हणजे दुबई मधील सलोनी सी ओलिया आहे. सध्या या युवतीसोबत सलमान प्रेमात मश्गुल असल्याचे समजते. सलमान आणि ओलियाला मुंबईमध्ये सुद्धा एकत्रित फिरताना काही जणांनी पहिले आहे. दिल्लीमध्ये एका ईवेंटमध्ये सुद्धा सलमान आणि ओलियाची जोडी सहभागी झाली होती.

गेल्या काही दिवसापासून आलिया ही मुंबईतील ताज लैंड्स एंड हॉटेलमध्ये थांबली आहे. या ठिकाणी तिला भेटण्यासाठी सलमान येत असल्याचे समजते. काही दिवसापूर्वी कमाल खानने सलमान खान दुबईमध्ये लग्न करणार असल्याचे ट्विट केले होते. त्यामुळे सर्वाचे लक्ष पुन्हा एकदा सलमानच्या लग्नाकडे लागले आहे.

Leave a Comment