फॉर्कलिफ्टवरून कोसळल्यामुळे इम्रान खान जखमी

लाहोर, दि. ७ -राजकारणात सक्रिय झालेले पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान आज फॉर्कलिफ्टवरून कोसळल्यामुळे जखमी झाले. त्यांच्या
डोक्याला दुखापत झाली आहे. मात्र, या दुखापतीचे स्वरूप तातडीने समजू शकले नाही. पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख असलेले इम्रान सार्वत्रिक निवहणुकीच्या प्रचारसभेसाठी येथे आले होते. व्यासपीठावर फॉर्कलिफ्टमधून नेले जात असताना इम्रान आणि त्यांचे अंगरक्षक तोल जाऊन जमिनीवर कोसळले. कुणीतरी खालून फॉर्कलिफ्टमध्ये चढण्याचा प्रयत्न केल्यामुळे इम्रान आणि इतरांचा तोल गेल्याचे समजते. दरम्यान, इम्रान यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

Leave a Comment