ऐशने केले शाहरुखला रिजेक्ट

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन फराह खानच्या आगामी काळात येत असलेल्या ‘हैपी न्यू इयर’ या सिनेमात शाहरुख खानच्या अपोजिट काम करणार असल्याची चर्चा होती. मुलीच्या जन्मानंतर ऐश सध्या पुनरागमनचा विचार करीत आहे. मात्र ऐशने हा निर्णय लगेचच बदलला असून आता ती ‘हैपी न्यू इयर’ या सिनेमात शाहरुखच्या अपोजिट काम करणार नाही.

या सिनेमात ऐशचा पती अभिषेक बच्चन काम करीत आहे. त्यामुळे ऐश या सिनेमात अभिषेक ऐवजी शाहरुखच्या अपोजिट काम करताना दिसणार होती. त्यामुळे रियल लाइफ कपलच ऑनस्क्रीन कपल पाहणे प्रेक्षकांना आवडले असते. त्यामुळेच ऐशने तिचे माइंडसेट चेंज करून या सिनेमात काम करण्यास नकार दर्शविला आहे.

तसे पहिले तर ऐशने यापूर्वी एसआरके सोबत ‘देवदास’ मध्ये काम केले होते. मात्र त्यानंतर ऐशने त्यासोबत सिनेमात काम केलेले नाही. ऐश-एसआरके ही जोड़ी पुन्हा पाहण्यासाठी काही जन एक्साइटेड आहेत. मात्र ऐशने घेतलेलेल्या या निर्णयामुले सर्वचजन हैराण झाले आहेत. ऐशने किंग खानला रिजेक्ट केल्याने आता फराह खान या सिनेमात कोणाला घेणार याची चर्चा रंगली आहे. कटरीना आणि प्रियंकाचे नाव सुरुवातीला चर्चेत होती. मात्र आता तिच्याजागी करीना अथवा दीपिकाचा नंबर लागण्याची शक्यता आहे.

Leave a Comment