दुष्काळात हवामानाचे अंदाज फक्त आकडेवारीच्या कामाचे

dushkal3सवेचि येतो मग पावसाळा या म्हणीप्रमाणे एप्रिल मे आला की, भारतीय हवामानविभागाचे पावसाचे अंदाज येवू लागतात. त्याचा उपयोग ते खरे ठरले की खोठे ठरले हे सिद्ध होण्यापलिकडे होताना दिसत नाही. पण जगातील अनेक हवामान संशोधन केंद्रांचे मोसमी पावसाचे अंदाज अचूक येवू लागल्याने अशा अंदाजांना महत्व आले आहे. भारतीय हवानाम विभागाचाही गेल्या पंधरा वर्षाचा असे अंदाज अचूक आल्याचा अंदाज आहे. आकडेवारीच्या परिभाषेत पाहिल्यास ते तसे सिद्ध करून देवू शकतात पण त्याचा देशातील शेतीच्या विकासाला किंवा दुष्काळ हटविण्याला उपयोग झाला आहे, असा दावा मात्र ते करू शकत नाहीत. गेल्या आठवड्यात पुढील वर्षीचा पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेले संपूर्ण वर्ष हे दुष्काळात गेल्याने चांगल्या पावसाचा अंदाजही आनंद देणारा ठरला आहे. पण जाणकारांच्या अंदाजाने जुलै महिना पुन्हा कोरडा जाण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीचा अंदाजही दुष्काळाची शक्यता दाखवणारा नव्हता. एवढेच नव्हे तर त्याच्या आधीची दोन वर्षेही अशीच निम्म्या निम्न्या दुष्काळाची गेली होती. तेंव्हाही हवमान विभागाने काही पूर्व सूचना दिल्या होत्या असे काही झाले नव्हते.त्यामुळे हवानाम अंदाजाची स्थिती वर्षानंतर ती खरी ठरली का, याची तपासणी करण्यापुरतीच मर्यादित झाली आहे. केंद्र सरकारने एखादा महासंगणक घेतला किंवा नव्या कोणत्याही संगणक केंद्राचे उद्घाटन झाले की, प्रथम त्याचा उपयोग हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी होईल, असे त्या त्या खात्याचे राजकीय पुढारी सांगत असतात. भारतात अशी स्थिती असली तरी जगात आज या अंदाजाची स्थिती बर्‍याच अंशी शेतीकडे उपयोग करण्याच्या दिशेने केली आहे. येणारा काळ हा हवामानाचा अंदाज अचूकपणे व्यक्त करण्याचा आहे . आजपर्यंत तो फक्त शेतकर्‍यांना पेरणीसाठी त्याची गरज भासायची. आताअनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनाची दिशा हवामानाच्या शक्यतेनुसार ठरवू लागली आहेत .

याकडे यावर्षी लक्ष जाण्याचे कारण म्हणजे दरवर्षी फक्त हवानाम विभागात होणारी हवामान अंदाजाची चर्चा आता आयटीसी, हिंदुस्थान लिव्हर, एफएमसीजी या कंपन्यांच्या वतीने आयोजित करण्यात येते. अशा कंपन्यांच्या संशोधक वर्गात एक हवामान शास्त्रज्ञ हमखास असू लागला आहे. वास्तविक भारतातील शेती उत्पन्नाचा वाटा हा देशाच्या एकूण उत्पन्नाच्या फक्त पंधरा टक्के आहे. अशावेळी या कंपन्यांनी हा ‘अव्यापारेशु व्यापार’ करण्याची गरज काय अशी शंका येणे सहाजिक आहे. त्याचे कारण असे सांगितले जाते की, देशाच्या उत्पन्नात जरी शेती उत्पन्नाचा वाटा पंधरा टक्के असला तरी बहुतेक बाजारपेठ ही मान्सूनवर अवलंबून असते. यावर्षीच्या अंदाजानुसार पाऊस 98 टक्के आहे. त्यातही केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, या राज्यांची स्थिती थोडी अडचणीसी असण्याची शक्यता आहे. बाकी ठिकाणी स्थिती समाधानकारक असणार आहे. पण येवढ्याने शेताच्या बांधावर सचिंत स्थितीत उभ्या राहणार्‍या शेतकर्‍याला दिलासा मिळेल असे काही नाही.

गेल्या बारा वर्षात हवनाम विभागाचे अंदाज किती बरोबर आले व त्याचा शेतीच्या गरजेशी किती संबंध राहिला हा मुद्दा महत्वाचा राहिला. उपलब्ध माहितीनुसार सन 2003 सालीअंदाज 96टक्क्याचा होता पण प्रत्यक्षात पाऊस 102 टक्के पडला. 2004 साली हाच अंदाज 98 टक्के होता पण पाऊस पडला 87 टक्के. दोन हजार पाच साली हे प्रमाण 99 व 98 होते. सहासाली ते 100 टक्के व92 टक्के असे होते. 7 साली ते 106व 93 आठ साली 98 व 100 टक्के होते. 9 साल हे धक्कादायक होते कारण त्यासाली पाऊस पडला फक्त 78 टक्के आणि अंदाज होता 93 टक्क्याचा. 2010 साली अपेक्षा व प्रमाण दोन्हीही 102 टक्के होते. असे असले तरी ते वर्ष मात्र नीट गेले नाही. 2011मध्ये पाउस 102 टक्के व अंदाज 95 टक्के होते. गेल्या वर्षी जेंव्हा राजकीय मंडळी दुष्काळाला गेल्या साठ वर्षात आम्ही असा दुष्काळ पाहिला नाही, असे म्हणत होतेे तेंव्हा अंदाज 99 टक्के व पाऊस 93 टक्के होता.

यातील दोन पद्धतीच्या पावसाची यात कोठेही दखल घेतली गेलेली नाही. ती म्हणजे मोसमी पावसाच्या आधीच्या पंधरा दिवसात व नंतरच्या पंधरा दिवसात जो सरासरीला छेद देणारा पाऊस पडतो त्याची दखल त्यात होत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात अंदाज एक व परिणाम निराळा होता. यातील धक्कादायक पावसाचे अंदाज मुंबईतील प्रलय आणि दक्षिण महाराष्ट्रात अगदी सांगली येथील राजवाडा चौक म्हणजे शहरातील मध्यवर्ती ठिकाण येथे आठ दिवस चार फूट पाणी होते, असा भयंकर पाऊस झाला याचाही अंदाज कोणी व्यक्त केला नव्हता. याच्या तुलनेत युरोप वअमेरिका, प्रामुख्याने जपान व इझ्रेल या देशात शेतीसाठीचे हवामान अंदाज अचूक असतात. भारतात बर्‍याच बेळा प्रश्न असा पडतो की, वेध शाळेच्या अंदाजात राजकीय हस्तक्षेप होतो काय. कारण अंदाज व्यक्त करताना ‘लोकांना काय वाटेल यावर भर दिला जातो. त्याच प्रमाणे बाजारपेठेत जीवनोपयोगी वस्तूची साठेबाजी सुरु होईल काय याकडे लक्ष दिले जाते असे वाटते.

या सगळ्या बाबींचे कारण असे दिसते की, अजून अंदाजाला संशोधनात गांभिर्याने घेतले जात नाही. तरुणांच्यात या अंदाज व्यक्त करण्याची स्पर्धाही लागलेली दिसत नाही. सध्या कोरियात युद्धाचे वातावरण आहे. पण त्यानी त्यांची जी संशोधकांची टीम तयार केली ती हवामानाच्या अंदाजासाठी तयार केली. प्रत्येक वेळी काही फक्त मोसमी पावसाचा अंदाज म्हणजेच सारे काही ही कल्पनाच काढून टाकली. त्यांंच्या शीतप्रदेशात वर्षाचे प्रत्येक दिवसाचे तपमान, वर्षभर पावसाची स्थिती बर्फ पडण्यासी स्थिती येवढेच नव्हे तर त्यांना जेवढे ऊबदार दिवस मिळतात त्यातील प्रत्येक उबदार तासाचा अंदाज व्यक्त करण्यातून देशातील तरुणांच्या मनातील संशोधनाची आवड निर्माण केली. त्यांनी युद्धाची केलेली तयारी तर अजून टोकाची आहे. वजा दहा तपमानात त्यांनी काही हजार सैनिकांना काही तास नेहेमीच्या कमी कपड्यात थांबण्याचे प्रशिक्षण दिले यात महिलांनाही ते प्रशिक्षण घ्यावे लागले.

यावर चर्चा करण्याचा हेतू येवढाच की, राजकीय पुढारी म्हणतात त्याप्रमाणे हा जर शतकातील दुष्काळ होता तर त्यावरील संशोधनासाठीच्या प्रयत्नाना गती का मिळाली नाही. त्यात एकच लक्षात आले की, सत्तर हजार कोटी रुपये उपसाजलसिंचनावर खर्च होवूनही जर पाणी अडविले गेले नाही, अशा चर्चेतील सूर वाढला की, काही राजकीय नेते ‘यावर्षी आयुष्यात कधी न पाहिलेला दुष्काळ पडला आहे. असे बोलून दाखवत. जगात प्रत्येक तासाचे हवानाम अंदाज व्यक्त करण्याचे तंत्र उपलब्ध असताना व देशात प्रत्येक पन्नास मैलावर आता प्रयोग शाळा सुरु झाल्या असलयानाही अजूनही प्रत्यक्षात त्याला गती येताना दिसत नाही. प्रत्येक ठिकाणचे व प्रत्येंक तासाचे तपमान सांगणारे संशोधक भारतात असातानाही हा विषय गांभिर्याने घेतला जाताना दिसत नाही.

Leave a Comment