बॉलीवुड अभिनेत्री सोनम कपूर गेल्या काही दिवसापासून भलतीच फॉर्ममध्ये आहे. त्यामुळेच सध्या ती साधारण भूमिका असलेले रोल नाकारत आहे. तिने ठरविल्याप्रमाणे जर त्या सिनेमाची कथा व रोल नसेल तर ती स्पष्टपणे नकार दर्शवित आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसपासून तिने ऑफर असूनही मोठ्या बनरचे दोन-तीन सिनेमे सोडले आहेत.
याबाबत बोलताना आभिनेत्री सोनम म्हणाली, ‘ गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडमधील आघाडीच्या नायिका फैशन आणि स्टायलिंग असलेल्या भूमिका करीत आहेत. त्यामुळे आता मी पण त्यांच्यासारखेच अभिनय करण्याचे ठरविले आहे. नवी फैशन तर आता सर्वच सिनेमातून येत आहे. त्यामुळे मी साधारण भूमिका असलेलेल्या रोलच्या ऑफर नाकारल्या आहेत.’
‘थैंक्यू’ ‘मौसम’ आणि ‘प्लेयर्स’ सारखे काही फ्लाप सिनेमे केल्यानंतर आता अभिनेत्री सोनम कपूर सध्या दिग्दर्शक आनंद राय यांच्या ‘रांझना’ या सिनेमाच्या शूटमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती एक साधारण युवतीची भूमिका करीत आहे. त्याशिवाय सोनमकडे सध्या ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘खूबसूरत’ या सिनेमाच्या रीमेकशिवाय तिच्याकडे आयुष्मान खुराना सोबत ‘यशराज फिल्म्स’ चा एक सिनेमा आहे. त्या सिनेमाच्या नावाची घोषणा अजून करण्यात आलेली नाही.