सुशीलकुमार झाला दुखापतीतून बरा

इंदौर- ऑलिम्पिक स्पर्धेनंतर गेले काही दिवस कुस्तीपटू सुशीलकुमार हा खांद्याच्या दुखापतीने त्रस्त होता. सुशीलकुमारची ही दुखापत आता बरी झाली आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये होणार्‍या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी तो सज्ज झाला आहे. यापुढील सगळ्या स्पर्धा तो खेळणार आहे.

भारताचा ऑलिम्पिक पदकवीर सुशीलकुमार गेल्या बर्‍याच काळापासून खांद्याच्या दुखापतीने त्रस्त होता. या दुखापतीपासून तो आता सावरला असल्याने पुन्हा आखाड्यात उतरण्याची जोरदार तयारी आता सुशीलकुमारने चालवली आहे. यापूर्वी दुखापतीमुळे सुशीलकुमारला आशियाई कुस्ती स्पर्धेला मुकावे लागले होते.

याबाबत बोलताना सुशीलकुमार म्हणाला, ‘ देशासाठी पुन्हा एकदा चांगली कामगिरी करायची आता वेळ आली आहे. दुखापतीमुळे मी प्रशिक्षण बंद केलेले नव्हते. त्याचे स्वरूप बदलले असल्याने सातत्याने आखाड्यात मी सराव करीत होतो. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेनंतर मला कोणत्याही मोठ्या स्पर्धेत भाग घेता आलेला नाही.’

Leave a Comment