आलिया भट्ट शुटमध्ये बिजी

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट्ट शुटमध्ये खूपच बिजी आहे. तिच्या बिजी असण्याचे कारण एकानंतर एक येत असलेले दोन सिनेमे हे आहे. आलिया सध्या एकीकडे ‘२ स्टेट्स’ या सिनेमाचे शूटिंग करीत आहे. तर दुसरीकडे ती इम्तियाज अलीच्या ‘हाईवे’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

आलिया सध्या दोन सिनेमाच्या शूटिंगचा मजा घेत आहे. तिचा ‘हाइवे’ हा सिनेमा डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. तर दुसरीकडे ‘२ स्टेट्स’ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. याबाबत बोलताना आलिया म्हणाली, ‘ मी सध्या ‘हाईवे’ आणि ‘२ स्टेट्स’ या सिनेमाचे शूट सुरु असल्याने बिजी आहे. काही दिवसापूर्वीच ‘ २ स्टेट्स ‘ या सिनेमाची शूटिंग पूर्ण झाली आहे. सध्या मी ‘हाइवे’ या सिनेमाच्या शूटिंगची तयारी करीत आहे.’

त्याशिवाय आगामी काळात आलिया कॉस्मेटिक ब्रांड्सच्या जाहिरातीत वरूण धवन सोबत तर आईवियर ब्रांडमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा सोबत झळकणार आहे. तिला नेहमीच शूटमध्ये व्यस्त राहण्यास आवडते २४ तासापासून ४८ तासापर्यंत शूटिंग करयाला तिला आवडते. आता चार-पाच दिवसानंतर ती ‘हाइवे’ सिनेमाच्या शूटिंगसाठी जाणार आहे.

Leave a Comment