जेमतेम एकाच चित्रपटातून दर्शन झालेली कॅनेडियन पॉर्न स्टार सनी लियॉनने
पाहता पाहता बॉलीवूडमध्ये आपला चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. तिच्या
‘जिस्म-2’ चित्रपटाला फारसे यश मिळू शकले नाही. पण आगामी ‘शुटआऊट अँट
वडाळा’ या चित्रपटातील तिचे आयटम साँग सध्या सर्वत्र धमाल उडवत आहे. या
गाण्यावर तिने दाखवलेल्या लटक्या-झटक्यांवर लाखो चाहते घायाळ होत आहेत.
अभिनयासोबतच आयटम गर्ल म्हणूनही लोकप्रियता मिळवत असलेल्या सनीचे नशीब
सध्या भलतेच जोरावर आहे. तिला एकापाठोपाठ एक ऑफर मिळत आहेत. एकीकडे तिची
कारकिर्दीची गाडी वेग पकडत असताना दुसरीकडे तिनेच केलेल्या करारात ती
पुरती अडकली आहे. निर्माता पराग संघवीसोबत सनीने तीन चित्रपटांचा करार
केला आहे आणि तोही थोडाथोडका नव्हे, तर पाच कोटींचा. जोपर्यंत हे तिन्ही
चित्रपट पूर्ण करत नाही तोवर सनी अन्य कोणताच चित्रपट स्वीकारू शकणार
नाही, अशी अट परागने आता तिला घातली असल्याचे समजते. अर्थात परागने मात्र
या खबरींचा इन्कार करत असे काहीच नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सनी तिची इच्छा असेल तो चित्रपट करू शकते. आम्ही एकमेकांशी ताळमेळ साधत काम करू.
सनी अतिशय व्यावसायिक असून एका चित्रपटासाठी ती इतर चित्रपट नाकारू शकत
नाही, असे त्याने स्पष्ट केले. आता नक्की काय आहे हे त्या दोघांनाच
माहीत. मात्र हे खरे असेल तर सनीची मोठीच गोची होणार आहे.
पहिला चित्रपट आपटल्यानंतरही सनीने हिंमत न हरता प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आयटम
साँगचा आधार घेतला. सनीचा हा प्रयोग बराच सफल ठरला. प्रेक्षकांना तिचे
ठुमके पसंतीस उतरले. यामुळेच तिला आता आयटम साँगसाठी सर्वांकडून ऑफर येत
आहेत. एवढे की, याबाबतीत तिने कॅटरिना कैफलासुद्धा पिछाडीवर टाकले आहे.
‘वेलकम’च्या सिक्वलमध्ये कॅटरिनाच्या जागी सनीची निवड झाली असून या दोघीत
सध्या काटे की टक्कर सुरू आहे. खरे तर या दोघींची पार्श्वभूमी बर्याच
बाबतीत समान आहे. दोन्ही विदेशातून भारतात आल्या आहेत. आता सनी कॅटरिनाला
मागे टाकून पुढे जाते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.