अश्विनीकुमार तेंडुलकर आणि सौ. अर्चना तेंडुलकर यांनी राज्यभर ऑडिशन्स घेऊन उभारलेल्या नवोदित मडळांच्या टीमने आणला आहे ‘तेंडल्या निघाला ऑस्करलाम हा चित्रपट. कथालेखक, कलाकार, संगीतकारच काय तर अगदी स्पॉटबॉयपर्यंतच्या नवोदित टीमने एकत्र येऊन बनवलेला चित्रपट ज्याच्या ‘मर्स्ट डे मर्स्ट शोम चित्रपट रसिकांसाठी विनामूल्य दाखविण्यात आला.
तर असा हा ‘तेंडल्या म्हणजे चित्रपटातला चित्रपट आहे. याचा नायक तेंडल्याला चित्रपट निर्मितीचे वेड आहे. त्यासाठी तो गावातील सर्वांना एकत्र करून चित्रपट निर्मिती करण्याचे ठरवतो आणि चित्रपटासाठी आवश्यक असा सारा मसाला यात भरण्यात आलेला आहे.
‘धाडसी तेंडल्या… कौतुकास्पद
चित्रपट सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासात मध्यंतराचा बोर्ड झळकतो. कारण नंतर बहुधा दिग्दर्शकाला तेंडल्याच्या चित्रपटाचे शूटिंग, त्या दरम्यान घडणारे प्रसंग सलग दाखवायचे असावेत. त्यात गावकर्यांची सिनेमा निर्मितीसाठी मिळणारी साथ, तेंडल्या आणि राधाचं प्रेम, शहरातून शूटिंगसाठी आलेली हिरोईन असे सर्व असून जोडीला आयटम साँग, प्रेमगीत आणि लावणीही आहे. ही तीनही गाणी छान जमून आलेली आहेत.
‘तेंडल्यामची भूमिका करणारा विनोद रेवाळे, नायिका दिशा परदेशी आणि श्रद्धा सांगावकर, सोबत असणारे देवेंद्र घावरे, सरोज राव, सुयशा गजानंद, सचिन बिडवई, राजेश चौधरी, नीलेश कोंडे, प्रशांत सातर्डेकर, इत्यादींसारखे कलाकार नवे असले तरी त्यांनी आपापल्या भूमिकांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षातला हा अभिनव प्रयोग जरी व्यावसायिकदृष्ट्या काही कारणांनी कमी पडत असल्यासारखा वाटला तरी एक प्रयत्न म्हणून न्नकीच कौतुकास्पद म्हणायला हरकत नाही.
निर्मिती- तेंडुलकर एंटरटेन्मेंट अॅन्ड मुव्हीज
दिग्दर्शक- डॉ. शशिकांत डोईमोडे
कलाकार- विनोद रेवाळे, दिशा परदेशी, श्रद्धा सांगावकर इ.
दर्जा- **
