संशोधनाला महत्व देणे गरजेचे – इस्रोची माजी प्रमुख ई व्ही चिटणीस

पुणे, दि. 4 (प्रतिनिधी) – भारतात नवनवे संशोधन करण्यासाठी नवोदित शास्त्रज्ज्ञांना संधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे शास्त्रज्ज्ञांना अमेरिकेसारख्या देशांची मदत घ्यावी लागत आहे. भारतात शास्त्रज्ज्ञांना संशोधनासाठी पुरेसे प्रोत्साहन मिळत नाही. भारतातील सायन्स धोरण अत्यंत गचाळ आहे. नको ते लोक धोरण बनवित आहेत.अशी खंत भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्त्रो) माजी संचालक डॉ.ई.व्ही.चिटणीस यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) व इतर संस्थांनी मिळून महाराष्ट्र ऑलिंपियाड अभियान सुरु केले आहे. ग्रामीण व शहरी प्रज्ञावंतांना आंतरराष्ट्रीय स्तरांवरील सर्वाच्च प्रज्ञा परीक्षांच्या प्रवाहात आणणे, हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानातील यशस्वी झालेल्या 70 विद्यार्थी-विद्यार्थिंनींना डॉ. चिटणीस यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या अभियानात जुनिअर (5 वी ते 7 वी) आणि सब जुनिअर (8 वी ते 10 वी) गटांतून एकूण 20 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा.राम ताकवले, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, आय-कॉन्सेटचे अध्यक्ष सी.के.देसाई, ऑलिंपियाडचे समन्वयक उदय पाचपोर उपस्थित होते.

सध्याच्या शिक्षण पद्धतीवर भाष्य करताना डॉ. चिटणीस म्हणाले,‘आजच्या शिक्षण पद्धतीतून मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण होताना दिसून येत नाही. ठराविक असे साचेबद्ध शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे नवनिर्मिती करण्याला प्राधान्य मिळत नाही. मुळात राज्यकर्ते शिक्षणाचे शत्रू आहेत, हे ध्यानत घेतले पाहिजे. त्यामुळे शिक्षण पद्धतीत आवश्यक बदल होणार नाहीत.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. चिटणीस म्हणाले,‘निरिक्षण, पाहणी आणि अंदाज वर्तविणे ही विज्ञानाची मुळ पद्धती आहे. विज्ञानात संशोधनाचा ध्यास घेत वेडे झाले पाहिजे. नव नवे शोध लावण्याचा मुर्खपणा सातत्याने केला पाहिजे. त्यासाठी सर्वातआधी विद्यार्थ्यांनी स्वत:ला ‘मी कोण आहेम असा प्रश्‍न विचारला पाहिजे. मुलांनी स्वत:ला ओळखणे आवश्यक आहे.म यावेळी जुनिअर गटातील श्रेयस चौधरी, कृष्णा मनूरकर, अक्षित केवलिया, गौरव भट्टड, यश जोशी आणि सब ज्युनिअर गटातील पार्थ लाथुरिया, कृष्णा आग्रवाल, रोहिणी पाटील, अभिषेक खोत आणि सना सुतार यांना सुवर्णपदकांनी गौरविण्यात आले. डॉ. ताकवले यांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नवनिर्मिती कशी साधता येईल? याबाबत विश्‍लेषण केले.

Leave a Comment