नागपूर- गेल्या काही दिवसपासून सुरु असलेले बलात्कारचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही असे दिसते. लग्नसोहळ्यात सहभागी झालेल्या एका सहा वर्षाच्या चिमुरडीवर २७ वर्षाच्या व्यक्तीने बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी चक्रधर बेले यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
नागपूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार
या ठिकाणी नातेवाईकाच्या लग्नात सहाभागी झालेल्या एका सहा वर्षाच्या मुलीला चक्रधर यांनी आईस्क्रीमचे आमिष दाखवले. आईस्क्रीमच्या आमिषाला भूललेल्या त्या चिरमुडीवर त्याने बलात्कार केला. या अल्पवयीन मुलीची तब्येत गंभीर आहे. पोलिसांनी चौकशीसाठी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, ठाणे शहरात उपचारासाठी हॉस्पिटलात गेलेल्या एका तरुणीला सलाइनमधून गुंगीचे औषध देत , डॉक्टरने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना दिवा परिसरातील स्वस्तिक हॉस्पिटलात घडली. विल्यम्स जेकब असे या डॉक्टरचे नाव आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून आरोपी जेकब पसार झाला आहे.