मुंबईतल्या अंडरवर्ल्डच बॉलिवुडला नेहमीच आकर्षण वाटल आहे. महेश
मांजरेकरचा ‘वास्तव’, राम गोपाल वर्माचा ‘कंपनी’, ‘दाउउद आणि हाजे
मस्तानच्या आयुष्यावर बेतलेला वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ माया डोळसची
कथा सांगणारा ‘शुटआऊट अॅट लोखंडवाला’ हे चित्रपट अंडरवर्ल्ड जगत
दाखविणारे होते. आता 80 च्या दशकात मुंबईमध्ये सुरू झालेल्या
अंडरवर्ल्डचा वेध घेणारा ‘शूटआऊट अॅट वडाळा’ हा चित्रपट संजय गुप्ताने
आणला आहे.
थरारक वास्तव मांडणारा ‘कंपनी’
‘शुटाअऊट अॅट वडाळा’ ही कहाणी आहे मुंबईच्या अंडरवर्ल्डवर 80 च्या दशकात
सत्ता गाजवणार्या मनोहर उर्फ मन्या सुर्वे (जॉन आब्रहम) या गँगस्टरची.
मध्यवर्गीय कुटुंबात वाढलेल्या मन्याला आपले शिक्षण पुर्ण करून घर
बसवायचे आहे. याचा भाऊ भार्गव गुंड आहे, त्याच्या वर हल्ला झाल्यानंतर
त्याला मन्या वाचवतो, त्यानंतर मनोहर सुर्वेला खुनाच्या खोट्या आरोपाखाली
जेलमध्ये जावं लागतं. आणि जेलमध्ये त्याचं आयुष्य पूर्ण बदलून जातं.
दरम्यान मन्याच्या परिक्षेचा निकाल लागतो त्याला 76 गुण मिळतात, मात्र
त्याचे स्वप्न संपलेले असते आणि तो वास्तवाचा सामना करण्याचा निर्णय
घेतो, त्यातूनच डॉन मन्या सुर्वे आकाराला येऊ लागतो.
पुण्याच्या येरवडा जेलमध्ये त्याची शेख मुनीर (तुषार कपूर) याच्याशी
मैत्री होते. तिथून ते दोघे फरार होतात आणि मुंबईला जाऊन मन्या आपली
स्वतंत्र गँग बनवतो. अंडरवर्ल्डमध्ये प्रस्थापित असणार्या दिलनवाझ
इम्तियाझ हसकर (सोनू सूद) आणि झुबेर इम्तियाझ हसकर (मनोज वाजपेयी) या
भाईं’ना आव्हान देत मन्या सुर्वे अंडरवर्ल्डमध्ये आपली हुकुमत गाजवायला
सुरूवात करतो. गँगवॉर रोखण्याची जबाबदारी असणारा पोलीस अधिकारी अश्फाक
बगरान (अनील कपूर) मन्या ज्या कॉलेजमधुन विशेष प्राविण्यासह पास झाला
होता त्याच कॉलेजमध्ये एन्काऊंटर करतो. ही घटना वास्तव असली तरी चित्रपट
हा ‘डोंगरी टू दुबई’ या पुस्तकावर अधारीत आहे.
दिग्दर्शक संजय गुप्ताने या चित्रपटात 80 च्या दशकाचा काळ तंतोतंत उभा
केला आहे. दाऊद इब्राहिमचा उदय होण्यापुर्वीचा हा काळ आहे. या चित्रपटात
दिलनवाझ इम्तियाझ हसकर नावाचे जे पात्र आहे तो म्हणजे दाऊद. दिग्दर्शकाने
मन्या सुर्वे हे नाव वगळता सर्व गँगस्टरची नावे बदलली आहे. कथा गँगस्टरची
असल्याने ती पडयावर साकरताना त्यात मसाला ठासून भरावा लागणार हे वास्तव
दिग्दर्शकने हेरून कथेत दम भरला आहे. त्याला झवेरी यांच्या संवाद लेखनाने
योग्यती साथ दिली आहे. प्रेक्षकांकडून टाळ्या आणि शिट्ट्या ऐकू येत
राहातील, असे संवाद पात्रांच्या तोंडी आहेत, गँगस्टरची लाईफ असल्याने
शिव्यांचा भडीमार चित्रपटात आहे.
जॉन आब्रहमने साकारलेला मन्या सुर्वे तर अफलातूनच आहे. जॉन आब्रहमच्या
अभिनयाची याआधी फारशी चर्चा झालेली नाही. मात्र या चित्रपटात तो मन्या
सुर्वे अक्षरशः जगला आहे. हसकर बंधूंच्या भूमिकेत सोनू सूद आणि मनोज
वाजपेयी यांनीही रंग भरले आहेत्त. आहे. तुषार कपूरचा अभिनयही चांगला आहे.
अनील कपूरचा पोलिसॉफिसर लक्षात राहतो.मन्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत
असलेल्या असलेल्या कंगना राणावतला फारसा वाव मिळालेला नाही. मात्र तिने
जॉन बरोबर दिलेले बेड सीन्स पैसा वसुल आहेत. अनु मलिकचे संगीत थिरकायला
लावणारे आहे. सनी लिऑनची लैला, प्रियंका चोप्राची बबली बदमाश आणि सोफी
चौधरीचा मन्या आला हे तीनही आ्याटम साँग्ज बघण्यासारखे आहेत. एकंदरीत
वास्तव गँरस्टच्या जिवनावर अधारीत शुटाअऊट अॅट वडाळा प्रेक्षकांना हव्या
असलेल्या सर्व गोष्टी देण्यात यशस्वी झाला आहे.
चित्रपट – शुटाअऊट अॅट वडाळा
निर्मीती – एकता कपूर, संजय गुप्ता
दिग्दर्शक – संजय गुप्ता
संगीत – अनू मलिक
कलाकार – जॉन अब्राहम, कंगणा राणावत, मनोज वाजपेयी, अनिल कपूर, सोनु सुद,