‘टीम इंडिया’त अनेक गेल

पुणे- गेल्या काही दिवसापासून आयपीएल स्पर्धेत चौकार-षटकारांचा घणाघात करणारा ख्रिस गेल हा भारतीय क्रिकेटप्रेमींचा आवडता बनला आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात त्याची फलंदाजी कशी असेल याकडेच सर्वांचे लक्ष असते. मात्र या ख्रिस गेलनेच ‘टीम इंडिया’त माझ्यासारखी प्रतिभा असलेले अनेक गेल असल्याची कबुली दिली आहे.

आगामी काळात ‘टीम इंडिया’साठी खेळायला आवडेल काय? असा प्रश्‍न त्याला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर हसत-हस्त देत गेल म्हणाला, ‘टीम इंडिया’त तर अनेक गेल आहेत. त्यामुळे या संघात मला कशी जागा मिळू शकेल. टीम इंडिया’ने एकदा टी-२०चे, तर दोनवेळा एकदिवसीय क्रिकेटचे जगज्जेतेपद पटकावले आहे. शिवाय, कसोटी किक्रेटमध्येही हा संघाने ‘नंबर वन’चे सिंहासन काबिज केलेले आहे. त्यामुळे या संघात अनेक नामवंत क्रिकेटपटू आहेत. याठिकाणी अनेक नवीन खेळाडू तयार होत असल्याने खेळाडूची कमतरता नाही. ‘

पुण्यात गतवर्षी साकारलेल्या ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ या क्रिकेटमधील दुर्मिळ साहित्यांच्या संग्रहालयाचा पहिला वाढदिवस वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी या क्रिकेट संग्रहालयाचे सर्वेसर्वा रोहन पाटे व श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन यांची प्रमुख उपस्थिती होती. केक कापल्यानंतर गेलने पत्रकारांशी दिलखुलासपणे गप्पा मारल्या.

Leave a Comment