आयपीएलच्या सेटवर पोहचला सैफ

सध्या सुरु असलेली आयपीएल स्पर्धा सर्वासाठी उत्सुकतेचा विषय झाली आहे. त्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यासोबतच अनेकजन या स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत. यामध्ये बॉलीवूडची मंडळीने मात्र जोरात आघाडी उघडली आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन ही मंडळी त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशनचे काम करीत आहे. त्यामध्ये आता सैफ अली खानची देखील भर पडली आहे.

मुंबईमध्ये सुरु असलेल्या एका आयपीएलच्या सामन्याच्या सेटवर बॉलीवुडचा अभिनेता सैफ अली खान देखील आगामी काळात येत असलेल्या ‘गो गोवा गोन’ या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत होता. या वेळी नवाब सैफ अली खानने न्यूजीलैंडचा दिग्गज खेळाडू डैनी मॉरिसन, माजी क्रिकेटर अजय जडेजा आणि भारताचा महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

या वेळी सैफ निळा टी-शर्ट आणि जींस घातल्यानंतर खूपच कूल वाटत होता. राज निडिमोरु निर्मित ‘गो गोवा गोन’ या सिनेमात सैफशिवाय कुनाल खेमू, वीर दास, आनंद तिवारी आणि पूजा गुप्ता हे कलाकार मंडळी प्रमुख रोल करीत आहेत. त्यामुळे ते देखील याठिकाणी उपस्थित होते.

Leave a Comment