२६/११ खटल्यातील पाकच्या वकीलाची हत्या

इस्लामाबाद- मुंबईवरील २६/११ हल्ला खटल्यातील पाकिस्तानातील वकील चौधरी झुल्फीकार अली यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकाराने सर्वत्र खळबळ माजली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी इस्लामाबादमध्ये घडली.

मुंबईवरील २६/११ हल्ला खटल्यातील वकील अली हे इस्लामाबादमध्ये वास्तव्याला होते. शुक्रवारी सकाळी ते कारने जात असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. मोटारसायकल वरून आलेल्या हल्लेखोरांनी १० ते १२ गोळ्या अली यांच्यावर झाडल्या. हल्ल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी लगेचच पसार झाले. गोळ्या लागताच आली यांचे कार वरचे नियंत्रण सुटले व ती रस्ता ओलांडून पलीकडे एका महिलेला धडकली. त्यात महिलेच जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अली यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आली यांचा अंगरक्षक ही या हल्ल्यात जखमी झाला आहे.

पाकिस्तानातील निष्णात वकील म्हणून अली यांचा परिचय होता. त्यांच्या हत्येमुळे पाक सरकारला जबरदस्त हादरा बसला आहे. त्यासोबतच अली हे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो हत्याप्रकरण तसेच माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यावरील खटल्यातही मुख्य वकील म्हणून काम पहात होते. घटनेनंतर पळून गेलेल्या हल्लेखोरांचा पोलिस तपास करीत आहेत.

Leave a Comment