केंद्रीय दक्षता आयोगाकडे भ्रष्टाचाराच्या ३० हजार तक्रारी

नवी दिल्ली, दि. ३ – गेल्या वर्षभरात केंद्रीय दक्षता आयोगाकडे अर्थात सीव्हीसीकडे भ्रष्टाचाराच्या जवळपास ३० हजार तक्रारी दाखल झाल्याची माहिती सरकारने आज दिली. गेल्या तीन वर्षात हा तक्रारींचा उच्चांक आहे. २०१२ मध्ये भ्रष्टाचारासंदर्भात २९ हजार ५५९ तक्रारी सीव्हीसीला प्राप्त झाल्या. त्यात व्हिसल ब्लोअरच्या ८१४ तक्रारींचाही समावेश होता. २०११ आणि २०१० मध्ये हेच प्रमाण १७ हजार ८३० आणि १६ हजार ६८७ इतके होते, असे कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती खात्याचे राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी लिखित उत्तराद्वारे राज्यसभेला सांगितले.  या सर्व तक्रारांची छाननी करण्यात येत असून त्यापैकी संबधित तक्रारी मुख्य दक्षता अधिकारी किंवा केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) पाठविण्यात येत आहेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Leave a Comment