अपंगांना दिलासा देणारी स्वस्त इलेक्ट्रीक व्हिलचेअर

नवी दिल्ली दि.३ – अपघाताने, शस्त्रक्रे येमुळे अथवा जन्मापासून अपंगत्व आलेल्या व्यक्तींना दिलासा देणारी बाब म्हणजे स्वस्त, सुलभ आणि हालचाल करण्यास अत्यंत सोयीची अशी इलेक्ट्रीक व्हीलचेअर लवकरच तयार केली जात आहे. इंडियन स्पायनल इन्ज्युरी सेंटरचे प्रमुख नेक्रम उपाध्याय यांनी ही माहिती दिली आहे.

या विषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की अजूनही व्हीलचेअरची गरज असलेल्या लोकांची संख्या प्रंचड मोठी आहे. सध्या उपलब्ध असलेल्या व्हिलचेअर सर्वसामान्यांना परवडणार्‍या नाहीत कारण त्यांच्या किंमती ६० हजार रूपयांपासून ते अगदी १० लाख रूपयांपर्यंत आहेत. नव्याने तयार करण्यात आलेली इलेक्ट्रीक व्हिलचेअर यापेक्षा निम्म्या किमतीत उपलब्ध होऊ शकणार असून त्यासाठी डिपाटमेंट ऑफ असिस्टीव्ह टेक्नॉलॉजी, ह्युमन इंजिनिअरींग रिसर्च लॅब या पिटसबर्ग विद्यापीठाच्या विभागाच्या संयुक्त सहकार्यातून तिची निर्मिती केली गेली आहे.

केवळ किंमत कमी करणे हे या संशोधनामागचे ध्येय नाही तर भारतीय वातावरणात तसेच ग्रामीण आणि शहरी विभागातील अपंगाना ती सारख्याच क्षमतेने वापरता आली पाहिजे असा त्यामागचा उद्देश आहे असे स्पाईन सव्र्हिसेसचे प्रमुख एच.एस. छाब्रिया यांनी सांगितले. ते म्हणाले की जागतिक बँकेच्या अहवालानुसार जगभरात ६ कोटी ५० लाख अपंगाना व्हिलचेअरची गरज आहे.

या चेअरसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ, जैवतंत्रज्ञान विभाग आणि विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे अनुदान दिले जाणार आहे.

Leave a Comment