राहुल देणार नव्या दमाच्या खेळाडूना संधी

कोलकता- खालच्या स्थानावर असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघाची राजस्थान रॉयल्सची शुक्रवारी गाठ पडणार आहे. या स्पर्धेत कर्णधार म्हणून राहुल द्रविडची कामगिरी लक्षणीय ठरत आहे. गेल्या काही सामन्यातून राहुलने नव्या दमाच्या खेळाडूना संधी दिली आहे. त्यामुळे या सामन्यात पण नव्या दमाच्या खेळाडूना संधी देण्याची शक्यता जास्त आहे.

गेल्या सामन्यात अटातटीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला त्यांनी पराभूत केले होते. त्यामुळे आत्मविश्वास वाढविणारा हा विजय ठरला आहे. अटीतटीच्या लढतींमध्ये नेतृत्वाचीच खरी कसोटी लागत असते. द्रविडने अगदी प्रारंभापासूनच आक्रमक असे धोरण अवलंबिले आहे.
या स्पर्धेत सुरुवातीपासून राहुल द्रविडने स्टार खेळाडूंवर भरवसा ठेवण्याऐवजी स्थानिक उदयोन्मुख खेळाडूंना संधी दिली आहे. अजिंक्य रहाणे जेव्हा मुंबई इंडियन्सचा भाग होता तेव्हा त्याला खेळण्याची संधी फारच कमी मिळाली. द्रविडने मात्र त्याच्यात आत्मविश्वास फुंकला आणि आज तो भारतीय संघाचा नियमित सदस्य बनला आहे.

त्याशिवाय द्रविडने संजीव सॅमसनला योग्य विचार करूनच निवडले आहे. सॅमसनकडे भरपूर गुणवत्ता आहे. कोलकाताच्या बाबतीत मात्र चित्र उलटे आहे. कोलकात्याला दिल्लीकडून हार पत्करावी लागली. या हंगामात त्यांनी काही नकारात्मक निर्णय घेतले आणि त्याचा फटका त्यांना बसला. संघातील प्रमुख खेळाडूंना दुखापतींनीही ग्रासले. भारतातर्फे खेळलेल्या मोहम्मद शमीऐवजी प्रदीप सांगवानला खेळविण्याचा निर्णय कोलकात्याच्या अंगलट आला. शुक्रवारचा सामना कोलकात्यात होणार असल्यामुळे त्यांचे पारडे थोडे जड असणार आहे.

Leave a Comment