नवी दिल्ली दि.३ – तरूणांचा प्रशासकीय सेवेकडे ओढा वाढत असला तरी देशात भारतीय प्रशासकीय आधिकार्यांच्या (आएएस) मंजूर असलेल्या सहा हजार २१७ पदांपैकी सुमारे दीड हजार पदे रिक्त असल्याची माहिती सरकारने आज दिली. यात उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक म्हणजे १३५ पदांचा समावेश आहे. त्यानंतर प. बंगाल (११९), मध्य प्रदेश (१०५) आणि बिहार (९०) यांचा क्रमांक लागतो.
देशात १५०० आयएएसची कमतरता
झारखंडमध्ये ८४ तर आंध्र, गोवा, मिझोराम अरूणाचल प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७८ पदे रिक्त आहेत. राजस्थान, तामिळनाडूला अनुक्रमे ७५ आणि ६७ आयएएसची प्रतिक्षा आहे. महाराष्ट्रालाही असे ६२ अधिकारी हवे असून कर्नाटक, केरळ ६० अधिकार्यांची वाट पाहत आहे.